IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात कुरिअरने आल्या तलवारी

by nagesh
Pune Crime | swards delivered through DTDC Courier Market Yard in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | औरंगाबाद शहरामध्ये (Aurangabad City) एकाचवेळी कुरियरने (Courier) आलेल्या तब्बल 37 तलवारी (Sword) पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जप्त केल्या. त्यानंतर आता असाच प्रकार पुण्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कुरियरने कोणतीही वस्तू मागवता येत मात्र पुण्यातील (Pune Crime) काही महाभागांनी तलवारीच मागवल्या आणि कुरियर कंपनीने त्या पाठवल्या. हा प्रकार शुक्रवारी (दि.31) सायंकाळी उघडकीस आला आहे. शुक्रवारी दुपारी नियंत्रण कक्षाला (Pune City Police Control Room) मार्केटयार्ड (Market Yard) येथील DTDC कुरिअर द्वारे (DTDC Courier Market Yard Pune) तलवारी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्याचे (Swargate Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior Police Inspector Ashok Indalkar) यांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. पोलिसांनी मार्केटयार्ड येथील कुरियर कंपनीच्या कार्यालयाची तपासणी केली असता पोलिसांना पार्सलमध्ये दोन धारदार तलवारी सापडल्या.

 

औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात तलवारी सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) कुरियरमध्ये अशा संशयास्पद पद्धतीने तस्करी (Smuggling) केली जात असल्यास पोलिसांना याची माहिती द्यावी असे आवाहन कुरियर कंपन्यांना केले होते.
त्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा (Crime) उघडकीस आला आहे. स्वारगेट पोलिसांनी तलवारी जप्त (Sword Seize) केल्या आहे.
या तलवारी पंजाब (Punjab) येथील लुधियाना (Ludhiana) येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
ज्या नावाने या तलवारी मागवण्यात आल्या आहेत त्यांच्याकडे पोलीस चौकशी (Inquiry) करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक येवले (PSI Ashok Yewale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | swards delivered through DTDC Courier Market Yard in Pune

 

हे देखील वाचा :

Aryan Khan Drugs Case | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ

PMC Gunthewari | पुणे महापालिकेने गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली

Delhi Saket Court | ‘मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवर जावई, नातवांचा हक्क’ – कोर्टाचा महत्‍वपूर्ण निर्वाळा

 

Related Posts