IMPIMP

Pune Crime | 17 वर्षाच्या मुलीचा वडिलच पैसे घेऊन लावून देत होता विवाह; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार

by nagesh
Pune Crime | Father-in-law molested 11-year-old cousin

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पती पत्नीचे पटत नसल्याने १७ वर्षाच्या मुलीला आपल्याकडे घेऊन जाऊन मुलाकडून २ लाख रुपये
व अ‍ॅक्टिव्हा गाडी घेऊन अल्पवयीन मुलीचे बाप लग्न लावून (Minor Girl Marriage) देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime )

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४४/२२) दिली आहे. त्यावरुन ५४ वर्षाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ५४ वर्षाच्या अनिसबरोबर विवाह झाला होता.
त्यांना एक १७ वर्षाची मुलगी आहे. तिचा विवाह करण्याच्या उद्देशाने त्याने तिला प्रलोभने दाखवून ऑगस्ट २०१७ मध्ये औरंगाबाद (Aurangabad) येथे घेऊन गेला. तिचे औरंगाबाद येथील एका सादिक नावाच्या तरुणाबरोबर लग्न करण्याची जबरदस्ती केली. त्याबदल्यात त्याने सादिक याच्याकडून २ लाख रुपये व अ‍ॅक्टिव्हा गाडी घेतली मुलीने अशा लग्नाला विरोध केल्यावर तिला त्याने मारहाण केली. ही मुलगी संधी साधून आपल्या आईकडे पुण्यात परत आली. तिने आपल्या आईला घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | The father of a 17 year old girl was arranging the marriage for money Shocking type of incident in kondhwa

 

हे देखील वाचा :

Pune Police News | ‘पुणे तिथे काय उणे ! ‘साहेब, मासे आणायला गावी जायचंय, सुट्टी द्या’; ‘खडक’ पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याचं ‘कडक’ पत्र व्हायरल

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Nilesh Rane On Ajit Pawar | ‘अजित पवारांचा Finance विषय कच्चा; अर्थखातं हे बुद्धिमान व्यक्तीकडे असायला हवं’ – भाजप नेते निलेश राणे

 

Related Posts