IMPIMP

Pune Crime | पिडित महिलेला गुन्हेगारची धमकी

by nagesh
Pune Crime News | Sexual assault on a woman by luring her into marriage, an incident in Kondhwa area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडल्याने पोलिसांनी (Pune Police) त्याच्यावर बलात्काराचा (Rape Case) गुन्हा (FIR) दाखल केला. पण, तरीही त्याला त्याचा काहीही फरक पडलेला नाही. आपल्यावरील केस मागे घ्यावी, यासाठी तो या महिलेचा पाठलाग करुन गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देत असून बदनामीकारक मेसेज पाठवत आहे. त्यामुळे या महिलेला जीणे असह्य झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक कोठे गेला असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका ४२ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नासीर सलीम सौदागर (Nasir Salim Saudagar) (वय ३०, रा. वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेवर नासीर याने बलात्कार (Rape In Pune) केला होता.
त्याचा पोलिसांनी जानेवारीमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतरही गेल्या ६ महिन्यांपासून नासीर या महिलेला त्रास देत आहे.
फिर्यादी या जेथे जाईल तेथे त्यांच्या मागे येतो.
त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी वारंवार मागे जाऊन त्यांना अश्लिल बोलून लज्जास्पद वर्तन करतो.
तुझ्या मुलीला व तुलाही सांभाळतो, माझ्यावरील केस मागे घे, अशी धमकी देत आहे.
तसेच बदनामी होईल असे मेसेज मोबाईलवर पाठवत आहे. या त्रासाला कंटाळून शेवटी या महिलेने पुन्हा तक्रार दिली आहे.

 

Web Title :- Pune Crime | The victim is repeatedly harassed by the criminal, who is threatening the victim

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बिबवेवाडी गोळीबार प्रकरणातील मोक्कातील आरोपींना जामीन

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | ACB ची नाशिकमध्ये मोठी कारवाई ! 28 लाख रुपये लाच घेणाऱ्या आदिवासी विभागाच्या बड्या अधिकाऱ्याला अटक

Mumbai-Pune Expressway | उद्या मुंबई-पुणे महामार्गावर ‘या’ वेळेत ट्रॅफिक ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

 

Related Posts