IMPIMP

Pune Crime | गोळीबार झाल्याचा बनाव करुन व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; 80 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हे शाखेकडून FIR

by nagesh
Pune Crime | Threatening to falsely implicate a businessman by faking a shooting; FIR by Crime Branch against Sarai criminal who demanded Rs 80 lakh ransom

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | पुण्यातील बोपदेव घाटात गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये फिर्य़ादी हाच गुन्हेगार असल्याचे निष्पन्न (Pune Crime) झाले आहे. आरोपीने गोळीबार झाल्याचा खोटा बनाव करून एका व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन 80 लाख रुपये खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 ने गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

असिफ इस्माईल खान (वय – 33, रा. कोणार्क पूरम सोसायटी, बंगला नं.38, कोंढवा खुर्द, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. असिफ खान याच्यावर आयपीसी 385, 387, 389, 120 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

असिफ खान याने शनिवारी (दि.26) मित्रासोबत घरी जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा युनिट 5 या गुन्ह्याचा तपास करत असताना असिफ खान व त्याचे साथीदार फरियाज पठाण, समीर शेख, शाहबाज खान यांनी गोळीबार झाल्याचा खोटा बनाव केल्याचे उघड झाले. आरोपींनी गुन्ह्याचा कट रचून गोळीबाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देऊन व्यावसायिक संतोष थोरात यांच्याकडे 80 लाख रुपये खंडणी मागितल्याचे उघड झाले. याप्रकरणी आरोपी असिफ खान याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आरोपी असिफ खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध करमाड पोलीस ठाणे,
औरंगाबाद ग्रामीण येथे दोन दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत,
तर पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाण्यात खंडणीचा एक असे एकूण तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कोणी पैसे मागत असेल तर नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी,
असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर,
पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, राजस शेख, शहाजी काळे,
आश्रुबा मोराळे, पृथ्वीराज पांडुळे, दाऊद सय्यद, विलास खंदारे, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Threatening to falsely implicate a businessman by faking a shooting; FIR by Crime Branch against Sarai criminal who demanded Rs 80 lakh ransom

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘मी विचारलेले प्रश्न…’

Neena Gupta | नीना गुप्तांचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी केले कौतुक

Shruti Haasan | आजारपणातील फोटो शेअर करत अभिनेत्री श्रुती हसन म्हणाली – ‘हा लुक देखील… ‘

 

Related Posts