IMPIMP

Pune Crime | पुण्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर ऊर्फ लालबादशाह खून प्रकरणात तिघांना अटक

by nagesh
Pune Crime | Sunny Hiwale accomplices charged in riot at Nobel Hospital three inmates arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | काँग्रेसचा कार्यकर्ता (Congress Activist) आणि बांधकाम व्यावसायिक (Builder) समीर हुसेन मनूर याचा खून (Murder) केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) सोमवारी रात्री उशिरा तिघांना अटक (Arrest) केली. आर्थिक वादातून त्यांनी समीर ऊर्फ लालबादशाह हुसेन मनूर Sameer alias Lalbadshah Hussain Manoor (वय ३२, रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रुक) याचा खून (Pune Crime) केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मेहबुब सैफान बलुरंगी (वय ३३, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), निलेश सुनिल कुंभार (वय ३०, रा. लक्ष्मी कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) आणि सुफियान फैयाज चौरी (वय १९, रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात (Pune Crime) घेण्यात आले आहे.

याप्रकरणी समीर याचे वडिल हुसेनसाब महंमदसाब मनुर (वय ६७, रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रक) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

समीर हा पूर्वी जनता वसाहत (janta vasahat pune) येथे रहायला होता. मेहबुब याची जनता वसाहतीत टपरी आहे. तो व्याजाने पैसे देत असे. तसेच भिशीही चालवित असे. समीरला मेहबुब याने संतोषनगर येथील प्लॉटच्या बांधकामाचे काम दिले होते. त्या व्यवहारापोटी मेहबुब याने पाच लाख रुपये दिले होते. त्यापैकी अडीच लाख रुपये समीरने परत केले होते. उरलेले अडीच लाख रुपये परत करावे, अशी मेहबुब समीरकडे वारंवार मागणी करीत होता. त्यावरुन दोघांमध्ये यापूर्वीही वादावादी झाली होती. या आर्थिक व्यवहारावरुन मेहबुब याने इतर तिघांशी संगनमत करुन कट (conspiracy of murder) रचला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

समीर हा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बुलेटवरुन दत्तनगर येथील कार्यालयात निघाला होता.
तो चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर ६ गोळ्या झाडल्या.
डोक्यात गोळी लागल्याने समीर बुलेटवरच पडला.
त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला.
भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth) याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

 

Web Title : Pune Crime | Three arrested in Pune Congress worker and builder
Sameer alias Lalbadshah Hussain Manoor murder case bharti vidyapeeth police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना पती-पत्नीला दर महिना देईल 5000 च्या जवळपास रक्कम, फक्त करावी लागेल इतकी गुंतवणूक

Omicron Covid Variant | पहिल्या संसर्गानंतर 3 पट लवकर संक्रमित करतो ओमिक्रॉन, ‘या’ लोकांना धोका जास्त; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन

 

Related Posts