IMPIMP

Pune Crime | ड्रेनेज साफ करताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, रांजणगाव MIDC मधील घटना

by nagesh
Buldhana Crime News | 26 years old girl found dead after falling from moving train

रांजणगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरातील फियाट कंपनीचे (Fiat Company) ड्रेनेज साफ करताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. मच्छिंद्र काळे (Machindra Kale) आणि सुभाष उघडे (Subhash Ughade) असे मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. दोन्ही कामगार बीव्हीजी (BVG) कंपनीसाठी मागील 18 वर्षापासून काम (Pune Crime) करत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फियाट कंपनीचे ड्रेनेज साफ (Drainage Duct) करण्यासाठी दोन्ही कामगार कंपनीमध्ये आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सुपरवायझर देखील होते. काम करत असताना एका कामगाराचा पाय चुकून घसरला आणि तो ड्रेनेजच्या डक्टमध्ये पडला. हा प्रकार पाहून त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या कामगाराने त्याला वाचवण्यासाठी डक्टमध्ये उडी मारली. दोघे बुडत असल्याचे समजताच सुपरवायझर यांनी मदतीसाठी हाक मारली. (Pune Crime)

 

सुपरवायझर हे कंपनीत मदत मागण्यासाठी गेले. मात्र डक्ट खोल असल्याने दोघेही लगेच बुडाले.
या दोघांना बाहेर काढणे कठीण होतं. अनेकांनी प्रयत्न केले. अखेर जेसीबीच्या सहाय्याने डक्ट फोडण्यात आला.
डक्टमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पाणी असल्याने दोघेही सापडत नव्हते. काही प्रमाणात घाण पाणी बाहेर
काढल्यानंतर दोघांचे मृतदेह सापडले. या दुर्दैवी घटनेमुळे कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title :-  Pune Crime | two employees died getting trapped in the fiat company drainage

 

हे देखील वाचा :

T20 World Cup | “…तर भारत उपांत्यफेरीत खेळण्याच्या लायक नाही; इरफान पठाणने व्यक्त केले रोखठोक मत

NCP Chief Sharad Pawar | हाताला पट्टी अन् कातर झालेला आवाज, शरद पवारांनी ‘मंथन शिबिरा’ला लावली हजेरी (व्हिडिओ)

Chandrakant Khaire | काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या विधानाबाबत चंद्रकांत खैरेंची दिलगिरी, म्हणाले…

Uddhav Thackeray | ‘राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार’, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

 

Related Posts