IMPIMP

Pune Crime | पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची टोळक्याकडून तोडफोड

by nagesh
Pune Crime | Vehicles parked on the road in Pimple Gurav area of Pimpri Chinchwad were vandalized by a pune criminals

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथे मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) केली. तसेच परिसरात दहशत माजवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे (Pune Crime) वातावरण आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याबाबत सूर्यभान दगडू चोथवे Suryabhan Dagadu Chothve (वय-40 रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने घटनास्थळी धाव घेतली. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्यांची वाहने नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला पार्क केली होती.
रात्री एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वाहनाची तोडफोड केली.
या घटनेत आय टेन i 10 (एमएच 14 सीएस 0655) आणि अल्टो Alto (एमएच 14 बीआर 0371)
या वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे.
आरोपींनी दारुच्या नशेत गाड्यांची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Vehicles parked on the road in Pimple Gurav area of Pimpri Chinchwad were vandalized by a pune criminals

 

हे देखील वाचा :

BCCI On Virat Kohli | ‘किंग’ कोहली IPL मधील फॉमर्मुळे गमावू शकतो भारतीय T-20 च्या संघातील जागा; BCCI ने दिले संकेत!

Pune Crime | सुझुकी ईको गाड्यांचे सायलेंन्सर चोरणाऱ्या दोघांकडून आणखी गुन्हे उघडकीस, एकूण 14 गुन्हे उघड; लोणीकाळभोर पोलिसांची कारवाई

PM Narendra Modi On Fuel Price | महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं…

 

Related Posts