IMPIMP

Pune Crime | दुहेरी खुन प्रकरणातील फरार 7 आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | Yerwada Police Arrest Seven Criminals Who Abscond In Double Murder Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | पूर्ववैमनस्यातून 10 ते 11 जणांच्या टोळक्याने धारदार हत्याराने वार करुन दोघांचा खून (Double Murder) केला होता. यप्रकरणातील मागील चार दिवसांपासून फरार असलेल्या 7 आरोपांना येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerwada Police Station) तपास पथकाने बेड्या ठोकल्या (Pune Crime) आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. खुनाची घटना शनिवारी (दि.12) पहाटे तीनच्या सुमारास घडली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुभाष किसन राठोड (वय-40) आणि अनिल उर्फ पोपट भिमराव वाल्हेकर (वय-35 रा. पांडु लमाण वस्ती, येरवडा) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत लक्ष्मण किसन राठोड याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवशंकर अंजनकुमार हरगुडे (वय-20) साहिल राम कांबळे (वय-20), कृष्णा राजू पवार (वय-23), निशांत तायप्पा चलवादी (वय-20), रोहित परशुराम सणके (वय-21), गौरव उर्फ साहिल रवी चव्हाण (वय-20), सोनु शंकर राठोड (वय-20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात आतापर्य़ंत 11 आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Pune Crime)

 

फिर्यादी लक्ष्मण राठोड हे त्यांचा भाऊ सुभाष आणि मित्र अनिल यांच्यासह शनिवारी (दि.12) पहाटे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी 10 ते 11 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये सुभाष आणि अनिल यांचा मृत्यू झाला तर फिर्यादी जखमी झाले होते. यातील मुख्य आरोपी शंकर मानु चव्हाण (वय-54) आणि बादल शंकर चव्हाण (वय-25 दोघे रा. पांडु लमाण वस्ती, येरवडा) यांना शनिवारी अटक (Arrest) केली होती. परंतु उर्वरित आरोपी फरार झाले होते.

 

येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे (Investigation Team) पोलीस आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी आरोपी वाघोलीतील वाघेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या माळरानात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior Police Inspector Balkrishna Kadam) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar),
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे (Police Inspector Uttam Chakra)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे (PSI Ankush Dombale), सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, संजय राऊत,
पोलीस हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खारेडे, पोलीस नाईक अमजद शेख, कैलास डुकरे, किरण घुटे,
सागर जगदाळे, उत्तम गट, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Yerwada Police Arrest Seven Criminals Who Abscond In Double Murder Case

 

हे देखील वाचा :

Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले..

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा

Jitendra Awhad | ‘माझ्यावरील गुन्हा सिद्ध करताना पोलिसांना नाकी नऊ येईल’ – आ. जितेंद्र आव्हाड

 

Related Posts