IMPIMP

Pune Crime | नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुटल्यानंतर तरुणाची आत्महत्या; सलग दुसर्‍या घटनेने खळबळ

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | सोशल मीडियावर मुलींच्या नावाने चॅटिंग करुन तरुण मुलांना जाळ्यात ओढायचे. त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉलिंग (Video Calling) करुन अर्धनग्न होण्यास सांगून त्याचे स्क्रीन शॉट काढून ब्लॅकमेल (Blackmail) करायचे असे प्रकार वाढले आहेत. या त्रासाला कंटाळून दत्तवाडी, सहकारनगर भागातील दुसर्‍या तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंतनू (वय १९) असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी त्याच्या भावाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३५/२२) दिली आहे. हा प्रकार दत्तवाडीमधील एका सोसायटीत २८ सप्टेबर रोजी दुपारी घडला होता. अशीच एक घटना धनकवडीमध्ये ३० सप्टेंबर रोजी घडली होती.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ इंस्टाग्राम (Instagram) आयडीवरुन एका अनोळखी प्रित यादव नावाच्या आयडीवर चॅटिंग करीत होता. त्यांच्या भावाचे अर्ध नग्न फोटो (Nude Photo) तिने पाठविण्यास सांगितले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने त्याच्याकडून 4 हजार 500 रुपये फोन पे वरुन घेतले होते. त्यानंतरही धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली जात होती. या त्रासाला कंटाळून शंतनू याने 28 सप्टेंबर रोजी घराच्या इमारतीवरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी अंत्यसंस्कार व सर्व विधी केल्यानंतर बुधवारी याबाबत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी
देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने धनकवडी येथील एका तरुणाने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास
घेऊन आत्महत्या केली होती. अमोल यानेही या तरुणीच्या धमकावणी नंतर तिला साडेचार हजार रुपये पाठविले होते.
तिच्या सततच्या त्रासामुळे अमोल याने तिला ‘‘मै सुसाईड क रहा हू’’ असा संदेश पाठविला होता.
त्यावर तिने ‘‘करो सुसाईड मै सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल कर रही हू ’’अशी धमकी दिली.
त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Youth commits suicide after being robbed after threatening to spread nude photos viral; Shocked by the second incident in a row

 

हे देखील वाचा :

Communist Party of India | वेगळ्या राजकारणाचे संकेत, लाल बावट्याचा भगव्याला पाठिंबा, ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून भाजपविरोधात लढणार!

Swachh Bharat Abhiyan | ऋतुजा भोसले, डॉ. सलील कुलकर्णी पुणे शहर ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही; ते जेव्हा अस्वस्थ होतात तेव्हा… – चंद्रशेखर बावनकुळे

 

Related Posts