IMPIMP

Pune Crime | PLAYBOY होण्याच्या नादात तरुणाने गमावले 17 लाख ! वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा ‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या भुलभुलैयात गमावला

by nagesh
Pune Crime | Chain Snatching In Vishrantwadi Chowk Yerwada Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | प्लेबॉय कंपनीचे लायसन्स (Playboy Company License) काढण्यासाठी व मेंबर (Member) होण्यासाठी रजिस्ट्रेशन (Registration) करुन एक ते दोन तासात अडीच ते तीन हजार रुपये कमवा अशा जाहिरातीला एक तरुण भुलला आणि तब्बल 17 लाख 38 हजार रुपये गमावून बसल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. याप्रकरणी एका 27 वर्षाच्या तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या फेसबुकवर (Facebook) प्लेबॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी व मेंबर होण्यासाठी इंडियन एस्कॉर्ट सर्विसवर (Indian Escort Service) ऑनलाईन रजिस्टेशन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यात एक ते दोन तासात अडीच ते तीन हजार रुपये कमवा अशी जाहिरात करण्यात आली होती. फिर्यादीने त्यावर दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता, त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला सांगितले. (Pune Crime)

 

त्यानुसार त्यांनी रजिस्टेशन केल्यावर लायसन्स फी (License Fee), रुम भाडे (Room Rent),
पोलीस व्हेरिफिकेशन (Police Verification, पिकअप ड्रॉप (Pickup Drop), लेट फी पॉलिसीची रक्कम (Late Fee Policy Amount)
व त्याची लेट फी अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या फोन पे (PhonePe) वर 25 जुलै ते 24 ऑक्टोबर 2021 दरम्यान 17 लाख 38 हजार 822 रुपये भरायला लावले.
त्यानंतर प्लेबॉय कंपनीने कोणत्याही पॉलिसीचा फायदा न देता फिर्यादीचे पैसे परत न करता फसवणूक केली आहे.
तरूणाने वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा ‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या भुलभुलैयात गमावला.
पोलीस निरीक्षक खोमणे (Police Inspector Khomane) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | Youth loses Rs 17 lakh for not being PLAY BOY Fathers retirement money lost in Indian Escort Service

 

हे देखील वाचा :

Pune Police | पुणे पोलीस अँक्शन मोडमध्ये ! धनकवडी परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगची काढली धिंड

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांनो 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हा – उच्च न्यायालयाचे निर्देश

Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाले – ‘या देशासाठी तुमचं योगदान काय?’

 

Related Posts