IMPIMP

Ajit Pawar | ‘राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका, नियम पाळा’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar warns dont force everything stop again maharashtra corona cases increasing

पुणे  :सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar |  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यासह राज्यातील निर्बंधाबाबत एक कडक शब्दात इशारा दिला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, हे आपण सर्वच पाहात आहोत. त्यामुळे नियम पाळले पाहिजेत हे सर्वांनी समजून घ्यायला हवं. कोरोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झालाय. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून घ्यायला हवी. अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल आणि पुन्हा सगळं बंद करण्यासाठी भाग पाडू नका, असा इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. त्यावेळी पवार यांनी पुण्यात (Pune) पत्रकारांशी संवाद साधला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) बोलताना म्हणाले की, कोरोना संपल्याच्या अविर्भावात अनेकजण वावरत आहेत. हे काही योग्य नाही. हे थांबायला हवं. काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ लोकांनी सरकारवर आणू नये, असं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुढे अजित पवार म्हणाले, “काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूनं आहे. केंद्र सरकारनंही सांगितलं आहे की, खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी करताहेत, अशी विचारणा देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) केलीय.

दरम्यान, त्यावेळीे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य सहकारी बँकेवर ईडी नं छापेमारी केल्याचं वृत्त सोशल
मीडियात व्हायरल झालं. पण, अशी कुठलीही घटना घडलेली नाही. या धादांद खोट्या बातम्या आहेत.
मीडियानं विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास आता उडत चालला आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Ajit Pawar | ajit pawar warns dont force everything stop again maharashtra corona cases increasing

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार’

Crime News | बेपत्ता दीर-भावजयीच्या आयुष्याचा धक्कादायक शेवट

SSY | अवघ्या 250 रुपयात उघडा ‘हे’ खाते, मिळतील 15 लाख, जाणून घ्या कसे?

Ajit Pawar | … अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा राज्यातील जनतेला थेट इशारा

Pune Shivsena | पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुखपदी आदित्य शिरोडकर

LIC Kanyadaan policy | जर तुम्ही ‘या’ योजनेत जमा केले 130 रूपये तर मॅच्युरिटीनंतर मिळतील पूर्ण 27 लाख; जाणून घ्या कसे?

 

Related Posts