IMPIMP

Pune District Court | पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज 2 शिफ्टमध्ये

by nagesh
Pune District Court | pune district court in two shifts

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  कोरोनामुळे (Corona) एकाच शिफटमध्ये सुरु असलेले पुणे जिल्हा न्यायालयातील (Pune District Court) कामकाज आता पुन्हा दोन शिफ्टमध्ये (two shifts) चालणार आहे. मंगळवार (दि.7) पासून पुणे जिल्हा न्यायालयातील (Pune District Court) कामकाज पुर्ववत झाले आहे. न्यायालयातील कॅन्टीन, बार रुम सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालयातील वकील पक्षकारांची गर्दी वाढली आहे.

 

उच्च न्यायालयाने (High Court) पुण्यातील सर्व न्यायालयांसाठी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत न्यायालय
सुरु करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मार्च महिन्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown)
न्यायालयातील कामकाज एका शिफ्टमध्ये सुरु होते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर न्यायालयातील कामकाज पुन्हा एकदा दोन शिफ्टमध्ये सुरु
केले होते. परंतु एप्रिल 2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (corona second wave) राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे मागील पाच महिन्यापासून न्यायालयातील कामकाज एका शिफ्टमध्ये सुरु होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्यात आले. त्यानंतर राज्यातील बहुतांश अस्थापना सुरु करण्यात आल्या. परंतु न्यायलयातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे जिल्हा न्यायालयातील कामकाज हे एकाच शिफ्टमध्ये सुरु होते. न्यायालयीन कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु करावे यासाठी पुणे बार असोसिएशनने (Pune Bar Association) पुढाकार घेतला होता.

 

न्यायालयातील कामकाजाच्या वेळा वाढविण्यासंदर्भात पुणे बार असोसिएशनने वकिलांचे म्हणणे (say) मागवले होते. यामध्ये अनेक वकिलांनी कोरोना नियमांचे पालन करुन न्यायालयीन कामकाजाची वेळ वाढवण्याची विनंती केली होती. त्यानुसार पुणे बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार उच्च न्यायालयाने आदेश जारी करत न्यायालयाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत.

 

यासंदर्भात पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक (Adv. Satish Mulik) यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालयातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु झाले असले तरी कोरोनामुळे नियामांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे.
न्यायालयात येताना मास्क घालणे, न्यायालयीन कक्षात गर्दी न करणे यासह इतर नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे.

 

Web Title : Pune District Court | pune district court in two shifts

 

हे देखील वाचा :

Pune Court | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास 5 वर्षे सक्तमजुरी

Pune News | विध्यार्थी हे देशाचा नविन इतिहास घडवणारी नविन पिढी – अनुराधा ओक

Antilia Case | NIA चार्जशीटमध्ये माजी कमिश्नर परमबीर सिंह यांचे नाव नाही, मात्र सायबर एक्सपर्टच्या जबाबातून प्रश्न उपस्थित

 

Related Posts