IMPIMP

Pune Hadapsar Crime | पुणे : शिवजयंती मिरवणुकीत वाद, धारदार शस्त्राने वार करुन तोडली करंगळी

by sachinsitapure
Bhosari Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | शिवजयंती मिरवणुकीत (Shivjayanti Miravnuk) झालेल्या वादातून चार जणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना 29 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास साडेसतरा नळी (Sade Satra Nali) येथील गोगावले सुपर मार्केट येथे घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अभिषेक गजानन पाचपवार (वय-17 रा. माळवाडी, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओम कदम, आदित्य उर्फ बाबु भोसले, सोन्या भोसले, कृष्णा मारुती भोसले यांच्यावर आयपीसी 326, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये आरोपी आणि फिर्यादी यांच्यात धक्काबुक्की झाली होती. याचा राग मनात धरुन आरोपींनी अभिषेकला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर ओम याने त्याच्या हातातील धारदार शस्ताने अभिषेकच्या डाव्या हातावर वार केला. यामध्ये अभिषेकची करंगळी तुटून तो गंभीर जखमी झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

घरमालकाला दांडक्याने मारहाण

पुणे : घर भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार बालेवाडी (Balewadi) येथील चोंदे पाटील लॉन्सच्या जवळ 29 मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास घडला. याबाबत आशिष सुरेश मोरे (वय-23 रा. रविवार बाजार जवळ, लोहगाव) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन शैलेश साहेबराव भालेराव (रा. वडाळी नाका, अमरावती), ऋषीकेश गायकवाड, राजरतन इंगळे यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत.

आशिष मोरे हे शैलेश याच्याकडे घराचे भाडे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी शैलेश याने घरभाडे देण्यास नकार दिला. त्याने आशिष याला दारु पिण्यास सांगितली. मात्र, त्याने दारु पिण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या शैलेश याने आशिषला शिवीगाळ केली. तसेच आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Crime News | पुणे शहरात अलेक्झांड्रिन पोपटांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक

Related Posts