IMPIMP

Pune Hinjewadi Crime | पिंपरी : तक्रारीवरुन खूनाचा गुन्हा दाखल, मात्र तपासात वेगळीच माहिती आली समोर

by sachinsitapure

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Hinjewadi Crime | पार्क केलेल्या दुचाकीला रिक्षाची धडक बसून दुचाकी खाली पडली. याकारणावरुन एका महिलेने रिक्षाचालकासोबत भांडण केले. यानंतर रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला. रिक्षाचालकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) खूनाचा गुन्हा (Murder Case) दाखल केला. मात्र, पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. हा खून नसून अपघाती मृत्यू असल्याचे पोलीस उपायुक्‍त बापू बांगर (DCP Bapu Bangar) यांनी सांगितले.

रिझवान यासीन मणियार (वय 34) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. याबाबत रिझवानचा भाऊ फरमान यासीन मनियार (वय 30, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार 30 ते 32 वर्षीय महिला व तिचा साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) यांच्‍या विरोधात आयपीसी 302 नुसार गुन्‍हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.30) सायंकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान बावधन (Bavdhan) येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे शनिवारी सायंकाळी रिझवान याच्या रिक्षाची पार्क केलेल्या दुचाकींना धक्का लागला. त्यामुळे रिझवान आणि 30 ते 32 वयोगटातील मराठी बोलणाऱ्या अनोळखी महिलेसोबत वाद झाले. त्यानंतर तिने तिचा पती किंवा नातेवाईक यांना बोलवून घेत रिझवानला कानाखाली मारली.

या घटनेनंतर रिझवानचा बावधन येथील तिरुपती हॉस्पिटल समोर मृतदेह आढळून आला. रिझवानला हातावर, छातीवर, नाकावर डोक्यामध्ये मारहाण केली तसेच गुप्तांगांमध्ये शस्त्र खुपसून खून केला असे प्रथमदर्शनी दिसून आल्याने हिंजवडी पोलिसांनी खुनाचा गुन्‍हा दाखल केला.

पोलिसांनी सुरुवातीला खुनाच्या अनुषंगाने तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज, शवविच्छेदन अहवाल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर तपासांती सदरचा प्रकार हा खुनाचा नसून अपघाताचा आहे हे निष्पन्न झालेले असून पुढील तपास त्याप्रमाणे करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्‍त बापू बांगर यांनी दिली.

Madha Lok Sabha Election 2024 | माढा लोकसभा मतदारसंघातून पुण्याचे प्रवीण गायकवाड?

Related Posts