IMPIMP

Pune lockdown | पुण्यात निर्बंध जोमात अन् व्यावसायिक कोमात

by nagesh
Restrictions in Pune | strict estrictions again pune district prevent spread omicron Covid Variant

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune lockdown | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus) सर्वानाच हतबल करून टाकलं आहे. मुख्यतः म्हणजे पुणे शहरातील पथारी-स्टॉल व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी वर्ग, तसेच हॉटेलदार यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आपला व्यवसाय कसा चालणार? एक तर दुकानाच्या वेळा वाढवल्या नाहीत दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांच्या हातात पैसे येईनात. त्यामुळे त्यामुळे अनेक व्यावसायिक आणि व्यापारी वर्ग लॉकडॉऊनच्या (Pune Lockdown) निर्बंधांमुळे निराशेत आहेत. तसेच, आत्मदहनाचे प्रयत्न होताहेत तरी देखील प्रशासन गप्प कसे? असं देखील प्रयत्नांनी व्यावसायिक लोक प्रश्न उपस्थित करताहेत. सध्या व्यापारामध्ये अनिश्चितता आहे. ते कधी संपेल या प्रतीक्षेत सर्व व्यापारी आहेत.

 

 

मागील दोन ते तीन महिने पुणे शहरात (Pune) कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. देशाची तुलना करता केवळ पुणे शहरात बाधितांचा आकडा प्रचंड होता. मात्र, सध्या पुणे शहरातील रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. कोरोनाची परिस्थिती लवकर आटोक्यात आल्याने शहरातील निर्बंध (Pune lockdown) शिथिल व्हावे अशी येथील पुणेकरांची मागणी आहे. शहरात सध्या दुकाने केवळ चार वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची प्रशासनाची परवानगी आहे. त्याचबरोबर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास मुभा आहे. तर बाकी दिवशी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात पण वेळा कमी असल्याने नागरिकांची देखील प्रचंड गर्दी पाहायला मिळते. तसेच घाईघाईत चार वाजता दुकानदारांना दुकाने बंद करावी लागतात. यामुळे आता व्यापारी आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या बाबतच्या पत्रकावर कमल व्यवहारे, संजय बालगुडे, बाळासाहेब अमराळे, शिवा मंत्री यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहर भाजपनेही व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला या अगोदरच पाठिंबा दर्शिविला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पालकमंत्री आज निर्णय घेणार?

पुण्यातील (Pune) असणारे निर्बंध (Restrictions) आज शिथिल होणार का? याबाबत पालकमंत्री निर्णय
घेणार का? यावर सर्वांचे लक्ष लगावून आहे. दरम्यान, पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने पुण्याचे
महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलिस
आयुक्त अमिताभ गुप्ता आदींची गुरुवारी भेट घेतली. त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत भावना
पोचविण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र
पितळीया तसेच राहुल हजारे, नितीन काकडे, मनोज सारडा, अजित सांगळे, अभय बोरा आदींचा समावेश होता.

 

हातगाडी, फेरीवाले, पथारी संघटनेचे कार्यवाह संजय शंके यांनी देखील व्यापाऱ्यांना पाठींबा दिला आहे.
शहरात सध्या चार नंतर दुकाने सुरु आहेत. त्याठिकाणी पोलिसांनी जबरदस्तीने दुकाने बंद केली. मात्र,
शुक्रवारीही सायंकाळी चारनंतर दुकाने सुरूच ठेवण्याचा निर्धार महासंघाने व्यक्त केला आहे. दरम्यान, दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सायंकाळी चार वाजेपर्यंत आहे. त्यानंतर दुकाने बंद करण्यास व्यावसायिकांना थोडा वेळ लागतो. मात्र, लगेचच पोलिस किंवा पालिकेकडून (Police and Municipalities) कारवाई होत आहे. प्रसंगी पाच हजार रुपयांचा दंडही वसूल केला जातोय. यावरून सध्या व्यापारी वर्ग त्रस्त झालेत.

 

या कमी वेळात व्यावसायिकांनी धंदा कसा करायचा? हा एक प्रश्न उभा आहे, या काळात धंद्यावर परिणाम
झाला आहे. रोजचा व्यवसाय हा पन्नास टक्केच होत आहे. त्यामुळे अनेक व्यापारी हतबल झाली आहेत.
तसेच, कर्जाचे हप्ते, विविध प्रकाराचे कर, वीज बिल यांचा भरणा करणे त्यांना क्रमप्राप्तच ठरत आहे. त्यात कोणतीही सवलत मिळालेली नाही. यामुळे व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

राज्य सरकारने (State Government) अनेक दुकानांना सायंकाळी चार पर्यंत परवानगी दिली आहे.
मात्र, शहरातील मॉल्सना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे मॉलमधील गाळे बंदच आहेत.
त्यांनी आपला व्यवसाय कसा करायचा? हा गंभीर प्रश्न समोर आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
यावरून अनेक मॉलचालकांने आंदोलन उभा केले आहे.
तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा करून देखील यावर तोडगा कधी? याच्या प्रतीक्षेत मॉलचालक आहेत.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) याना निवेदन दिले आहे,
पालकमंत्री अजित पवार (Guardian Minister Ajit Pawar) यांच्याकडेही पाठपुरावा केला.
त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil)
यांनीही व्यवसायावरील निर्बंध शिथिल करण्याचे आश्वासन दिले. मात्र यावर निर्णय झाला नाही.

 

 

Web Title :- pune lockdown | pune restriction lockdown businessman are in trouble

 

हे देखील वाचा :

Modi Government | PM मोदींचा मोठा निर्णय ! ’राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलले; जाणून घ्या नवीन नाव

Thackeray Government | ठाकरे सरकार लोक कलावंतांना 5 हजराची मदत करणार, किमान 56 कलाकारांना आर्थिक मदत मिळणार

Film Producer Vibhu Agrwal | चित्रपट निर्माता विभू अग्रवालवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, मुंबई पोलिसांनी केली अटक

Sachin Waze | अंबानी केस : सचिन वाझेला पुन्हा धक्का, कोर्टाने जामीन देण्यास दिला नकार, NIA ला आरोपपत्रासाठी दिली मुदतवाढ

 

Related Posts