IMPIMP

Modi Government | PM मोदींचा मोठा निर्णय ! ’राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलले; जाणून घ्या नवीन नाव

by nagesh
modi government rajiv gandhi khel ratna awards renamed as mejar dhyan chand khel ratna awards pm narendra modi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | खेलरत्न पुरस्काराबाबत मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. क्रीडक्षेत्रात दिले जाणारे सर्वात मोठे अवॉर्ड राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून आता हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या नावावर करण्यात आले आहे. हे अवॉर्ड आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyan Chand Khel Ratna Award) म्हणून ओळखले जाईल.

 

पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वता ट्विट करून याची माहिती दिली आहे. दरवर्षी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजे 30 ऑगस्टला खेळाशी संबंधीत अवॉर्ड दिले जातात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पीएम मोदी यांनी दिली माहिती

 

शुक्रवारी पीएम मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, ऑलम्पिक खेळात भारतीय खेळाडूंच्या शानदार प्रयत्नांनी आपण सर्व भारावून गेलो आहोत. विशेषता हॉकीत आपल्या मुला-मुलींनी जी इच्छाशक्ती दाखवली आहे, विजयाप्रती जी दृढ इच्छा दर्शवली आहे, ती वर्तमानातील आणि येणार्‍या पीढ्यांसाठी खुप मोठी प्रेरणा आहे.

 

 

मेजर ध्यानचंद यांना केले समर्पित

 

पीएम मोदी यांनी पुढे म्हटले देशाल अभिमान वाटावा अशा क्षणी अनेक देशवासियांची विनंती समोर
आली आहे की खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित केले जावे. लोकांची भावना
पाहता याचे नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केले जात आहे. जय हिंद!

पीएम मोदी यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले, मेजर ध्यानचंद भारताच्या त्या प्रमुख खेळाडूंपैकी
एक होते ज्यांना भारताला सन्मान आणि गौरव मिळवून दिला. देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्यांच्याच नावाने ठेवला पाहिजे.

खेलरत्न पुरस्कार 1991-92 मध्ये देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने सुरू करण्यात आला होता.

 

Web Title : modi government rajiv gandhi khel ratna awards renamed as mejar dhyan chand khel ratna awards pm narendra modi

 

हे देखील वाचा :

Thackeray Government | ठाकरे सरकार लोक कलावंतांना 5 हजराची मदत करणार, किमान 56 कलाकारांना आर्थिक मदत मिळणार

Film Producer Vibhu Agrwal | चित्रपट निर्माता विभू अग्रवालवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, मुंबई पोलिसांनी केली अटक

Sachin Waze | अंबानी केस : सचिन वाझेला पुन्हा धक्का, कोर्टाने जामीन देण्यास दिला नकार, NIA ला आरोपपत्रासाठी दिली मुदतवाढ

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय, रिटर्न न भरणारे 15 ऑगस्टपासून करू शकणार नाहीत हे काम

 

Related Posts