IMPIMP

Pune Loni Kalbhor Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन फळ विक्रेत्याला मारहाण, लोणी काळभोर परिसरातील प्रकार

by sachinsitapure

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Loni Kalbhor Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका फळविक्रेत्याला दोघांनी शिवीगाळ करुन डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार मंगळवारी (दि.12) रात्री पावणे अकराच्या सुमारास थेऊर (Theur) येथील जैन दवाखान्याजवळ (Jain Hospital) घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नागेश धारासिंग मकवानी (वय-33 रा. रुखे वस्ती, थेऊर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन नंदु शांताराम जाधव (वय-28), शुभम मजनू सावंत (वय-26 दोघे रा. जाधव वस्ती, थेऊर) याच्यावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदननगर येथून पेरु विक्री करुन घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी कोलवाडी येथील हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच डोक्यात दगड मारुन जखमी केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन मारहाण

कोंढवा : गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या रागातून एका व्यक्तीला दोन अनोळखी व्यक्तींनी हाताने व लाकडी बांबुने डोक्यावर मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.11) पहाटे चारच्या सुमारास येवलेवाडी बोपदेव घाटाच्या अलीकडे सी.एन.जी. पेट्रोल पंपाच्या पुढे घडली. याप्रकरणी राजेशकुमार लालारामजी माली (वय-45 रा. खोकरा सर्कल, मणिनगर, अहमदाबाद, गुजरात) यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अॅक्टिव्हा (एमएच 14 केपी 0929) दुचाकीवरील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्य़ादी यांनी त्याच्या चारचाकी गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या रागातून आरोपींनी हाताने व लाकडी बांबूने डोक्यात मारहाण करुन जखमी केली. तसेच फिर्यादी यांच्या गाडीच्या काचेवर दगड मारुन नुकसान केले. या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डिगोळे करीत आहेत.

Pune Sinhagad Road Crime | धक्का लागल्याच्या कारणावरुन कारची तोडफोड, सिंहगड रोड परिसरातील प्रकार

Related Posts