IMPIMP

Pune Lonikand Crime | प्रवासी महिलेसोबत कारमध्ये गैरवर्तन, उबेर चालकावर गुन्हा दाखल; लोणीकंद परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Lonikand Crime | पुण्यात एका उबेर कंपनीच्या चालकाने (Uber Driver) प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत लोणीकंद पोलिसांनी उबेर चालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.13) रात्री पवणे आठ ते सव्वा आठच्या दरम्यान बायफ कंपनी येथील रोडवर घडला आहे.

याबाबत आव्हाळवाडी येथील 25 वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन उबेर कंपनीच्या वॅगनर कार (एमएच 12 व्हीटी 0262) चालक अमरिष त्रिवेदी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Lonikand Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी घर बदलल्याने घरगुती सामान घेऊन आरोपीच्या कारमधून घेऊन
जात होत्या. घरगुती सामान कारच्या मागील सीटवर ठेवून फिर्यादी चालका शेजारी शीटवर बसल्या होत्या. बायफ कंपनी येथील भाड्याच्या घरात राहण्यासाठी सामान घेऊन जात असताना चालकाने फिर्यादी यांना अश्लील
स्पर्श केला. मात्र, चुकून स्पर्श झाला असेल असे समजून फिर्यादी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आरोपीने बायफ रोड पासून काही अंतरावर अंधाराचा फायदा घेऊन तरुणीसोबत अश्लील वर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. केदार (PSI VS Kedari) करीत आहेत.

Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती स्थिर, उद्या घरी सोडणार

Related Posts