IMPIMP

Pune NCP Nokari Mohastav | पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘नोकरी महोत्सवा’त 700 बेरोजगारांना नोकरी

by nagesh
Pune NCP Nokari Mohastav | Jobs for 700 unemployed in Pune NCP’s ‘Job Festival’

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune NCP Nokari Mohastav | शिवाजीनगर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोरोना काळात नोकरी गमावलेल्या बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रविवारी ‘नोकरी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवामध्ये (Pune NCP Nokari Mohastav) 1340 तरुण-तरुणींनी नावे नोंदवली होती. यापैकी 700 जणांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी (Job) मिळाली आहे. नोकरी मिळालेल्या उमेदवारांना कंपनीकडून अपॉइंटमेंट लेटर (Appointment letter) देण्यात आले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कंपनीकडून नोकरीचे अपॉइंटमेंट पत्र हाती पडताच निवड झालेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
लॉकडाउनमुळे (Corona Lockdown) गेली 2 वर्षे ते घरीच बसून होते.
नोकरीसाठी वणवण करूनही नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे ते निराश झाले होते.
पण राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या महोत्सवात त्यांना नोकरी मिळाली. आपल्या आयुष्यातील महत्वाचा प्रश्न सुटला याचा त्यांना आनंद झाला होता.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रविवारी शिवाजी नगर एसटी स्टँड (Shivaji Nagar ST Stand) समोरील भारत इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित केलेल्या या
महोत्सवाचे उदघाटन खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan) यांच्या हस्ते झाले.

 

 

यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap), प्रवक्ते अंकुश काकडे (Spokesperson Ankush Kakade), ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, नूतन प्रवक्ते प्रदीप देशमुख (ncp city spokesperson pradeep deshmukh) , पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष मृणालिनी वाणी, महेश हांडे, ए खुने पाटील आदी उपस्थित होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शिवाजी नगर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उदय महाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी सभागृह नेते निलेश निकम, माजी नगरसेवक आशा साने व मंगला पवार, गोविंद पवार यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

 

 

यावेळी बोलताना खासदार चव्हाण म्हणाल्या की, मोदी सरकारने (Modi government) 2 कोटी बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचे जाहिर घोषणा केली. पण त्यांनी उद्योगपती अदानी व अंबानी यांचाच विकास केला. युवकांना मात्र फसवले. त्या पुढे म्हणाल्या, की शिवाजी नगर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 ते 8 नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही खास प्रयत्न करणार आहोत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : Pune NCP Nokari Mohastav | Jobs for 700 unemployed in Pune NCP’s ‘Job Festival’

 

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारची ‘ही’ योजना विवाहित लोकांसाठी खुपच फायदेशीर, दरमहा मिळेल 10 हजारांची पेन्शन, जाणून घ्या

Home Loan | घसरणार्‍या व्याजदरांचा तुम्ही ‘या’ पध्दतीनं घेऊ शकता फायदा, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

Pune Police News | उत्तम आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचा ! आयर्नमॅन विजेत्यांकडून पोलिसांना धडे

 

Related Posts