IMPIMP

Pune Parvati Crime | राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला, दांडेकर पूल परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Parvati Crime | दांडेकर पूल परिसरात (Dandekar Pool) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर (Attack On Son Of NCP Office Bearer) हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि.28) रात्री एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी 13 जणांवर पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबत मयुर राम पालखे (वय-25 रा. दांडेकर पूल, सिंहगड रोड) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन धर्मादास कदम, चंद्रकांत कदम, गणेश कदम, निलेश कदम, रुपेश कदम, अमित कदम, प्रितम कदम, विकास कदम, अमोल कदम, कार्तिक, अमोल भास्कर (सर्व रा. दांडेकर पूल), अनिल लोंढे, आयुष अनिल लोंढे (रा.सानेगुरुजी वसाहत, सिंहगड रोड, पुणे) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 143, 145, 147, 148, 149 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर हा पुणे महापालिकेत कामाला आहेत. तर त्यांचे वडील राम पालखे सामाजिक कार्यकर्ते असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. गुरुवारी रात्री एक वाजता मयूर घरी निघाला होता. त्यावेळी आरोपीचा नातेवाईक असलेला आकाश लोंढे याने जाणुनबुजुन धक्का दिल्याने वाद झाला. यातून आरोपींनी मयूरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आरीपी कार्तीक याने त्याच्या हातातील कोयता उलट्या बाजूने दंडावर व पायावर मारला. तसेच डोळ्यावर ठोसा मारुन जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी राजेश रजपुत व चेतन सुर्यवंशी यांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

Related Posts