IMPIMP

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

by sachinsitapure

मुंबई : Mumbai To Pune Cabs | महागाईची झळ सर्वच क्षेत्रात बसत असताना आता टॅक्सीने मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर भार पडणार आहे. टॅक्सीच्या प्रकारानुसार आणि अंतरानुसार ही दरवाढ ५० रूपयांपासून २०० रूपयांपर्यंत होणार आहे.

मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गावर प्रवाशी वाहतुक करणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सी आणि निळी-सिल्व्हर एसी टॅक्सीच्या प्रवास भाड्यात सुधारणा करण्याची मान्यता मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत दिली आहे.

मुंबई टॅक्सी संघटनेने केलेल्या मागण्या लक्षात घेऊन खटुआ समितीच्या अहवालानुसार, भाड्यात सुधारणा करण्यास ही मान्यता दिली आहे. पुढील महिन्यापासून नवी भाडेवाढ लागू होऊ शकते.

नव्या भाडेवाढीनुसार, नाशिकसाठी एसी टॅक्सीसाठी प्रवाशांना १०० रुपये, शिर्डीसाठी २०० रुपये जास्त द्यावे लागतील. तसेच मुंबई-पुणे प्रवासाठी एसी व साध्या टॅक्सीसाठी ५० रुपये जास्त द्यावे लागतील.

मुंबई-नाशिक वातानुकूलित टॅक्सीसाठी सध्या प्रति प्रवासी दर ४७५ रु. भाडे आहे, नव्या दरानुसार ५७५ रु. मोजावे लागतील. तर मुंबई शिर्डी वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे प्रवास भाडे ६२५ रु. आहे.

तर नव्या दरानुसार ८२५ रु. मोजावे लागतील. मुंबई – पुणे साध्या टॅक्सीचा प्रति प्रवासी दर सध्या ४५० रु. आहे, नव्या दरानुसार ५०० रु. द्यावे लागतील. तसेच मुंबई – पुणे वातानुकूलित टॅक्सीसाठी प्रति प्रवासी दर सध्या ५२५ रु. आहे, तर नवीन दरानुसार ५७५ रु. मोजावे लागतील.

Related Posts