IMPIMP

Pune Crime | वारजे माळवाडी परिसरात दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 77 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार महेश विजय वांजळे याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 77 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार महेश विजय वांजळे Mahesh Vijay Wanjale (वय- 28 रा. गणपती माथा, वारजे, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. महेश वांजळे याला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

महेश वांजळे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवार, कोयता, लाकडे दांडके यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दिवसा व रात्री घरफोडी (Burglary), बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे
केले आहेत. मागील 5 वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 4 गंभीर गुन्हे (FIR) दाखल आहेत.

 

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महेश वांजळे
याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके
(Senior Police Inspector Shankar Khatke), पी.सी.बी. गुन्हे शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही
कामगिरी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | case of atrocity has been registered against sudhakar shelke brother of maval ncp mla sunil shelke

 

हे देखील वाचा :

Poor Eyesight | चष्मा लावण्याची येणार नाही वेळ, अवलंबा ‘हे’ 5 रामबाण उपाय; अनेक समस्यांपासून मिळेल आराम

Pune Pimpri Crime | मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या भावावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा

Potassium Rich Foods | पोटेशियमच्या कमतरतेमुळे येऊ शकतो थकवा आणि कमजोरी, आजपासून खायला सुरूवात करा ‘हे’ 5 फूड्स

 

Related Posts