IMPIMP

Pune Pimpri Crime News | घरमालकीनीचा भाडेकरुनेच केला विनयभंग, आरोपी गजाआड; दिघी परिसरातील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime News | A shocking incident in Moshi where the owner of the house was brutally beaten and molested after paying the house rent

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Pimpri Crime News | फ्लॅटचे घरभाडे मागण्यासाठी गेलेल्या घरमालकीनीला भाडेकरु दाम्पत्याने शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार बोपखेल परिसरात घडला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime News) सोमवारी (दि.16) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक (Arrest) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 31 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन तात्यासाहेब मुंडे (वय-40) आणि त्यांच्या पत्नीवर आयपीसी 354, 323, 509, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन तात्यासाहेब मुंडे यांना अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या मालकीचा बोपखेल (Bopkhel) परिसरात फ्लॅट आहे.
या फ्लॅटमध्ये मुंडे दाम्पत्य भाडेकरु म्हणून राहत आहे.
सोमवारी सकाळी फिर्यादी या फ्लॅटचे भाडे (Flat Rent) घेण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी भाडं मागितल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
तर आरोपी तात्यासाहेब मुंडे याने फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले.
असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरगुडे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | Landlady molested by tenant, accused Gajaad; Incidents in Dighi area

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून संजय राऊत यांनी सरकारला फटकारले; म्हणाले…

Union Budget 2023 | यंदाच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी; अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे सुतोवाच

Pune Crime News | सेलिब्रिटीच्या ओळखी सांगत 30 कोटींच्या फंडिंगचे आमिष दाखवून घातला दीड कोटीला गंडा; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

 

Related Posts