IMPIMP

Pune PMC Election 2022 | राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर प्रभाग रचना बदलण्याची शक्यता कमीच ! स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सप्टेंबरमध्येच होतील – प्रशासकीय अधिकार्‍यांना विश्‍वास

by nagesh
Pune PMC Election 2022 | Prabhag Ward structure unlikely to change after change of power in maharashtra ! Elections for local bodies will be held in September - trust the administrative authorities

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC Election 2022 | राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर प्रभाग रचना बदलण्याची शक्यता कमीच असून आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Maharashtra Municipal Election) सप्टेंबरमध्येच होतील, अशी चिन्ह दिसत आहेत. मतदार याद्या अंतिम (Final Voting List) झाल्यानंतर केंव्हाही निवडणूका जाहीर होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Pune PMC Election 2022)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ओबीसी आरक्षणामुळे (Maharashtra OBC Reservation) राज्यातील १८ महापालिका तसेच जिल्हा परिषद, नगरपंचायती, नगरपरिषदांच्या निवडणूका लांबल्या आहेत. जवळपास सर्वच स्थानीक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. अशातच नुकतेच राज्यात सत्ता बदल झाल्याने यापुर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुकांचा निर्णय बदलण्यात येईल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर ओबीसी आरक्षणाच्या तिढयामुळे निवडणूका फेब्रुवारीमध्ये होतील, यादेखिल चर्चेने जोर धरला आहे. (Pune PMC Election 2022)

 

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने वेळेत निवडणूका व्हाव्यात यासाठी प्रक्रिया यापुर्वीच सुरू केली आहे. जवळपास सर्वच ठिकाणची प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. तसेच प्रारूप मतदार याद्या देखिल जाहीर केल्या आहेत. प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर त्रुटी आढळल्याने या याद्या अंतिम होण्यास काही अवधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतू सर्वच ठिकाणी असलेल्या प्रशासकांचा कालावधी तसेच सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात दिलेली मुदत सप्टेंबर अखेर संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रभाग रचना बदलापासून सर्व गोष्टी पुन्हा नव्याने करायच्या झाल्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

यानंतर निवडणुकांची घोषणा होउन दीड महिना आचारसंहिता लागू करावी लागेल.
हा कालावधी फार मोठा असून यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेली डेडलाईन देखिल संपून जाणार आहे.
यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वाधीक पावसाचे जिल्हा अर्थात मुंबई, ठाणे व कोकण विभाग वगळता
उर्वरीत ठिकाणी निवडणूक घेण्यात कुठलिच अडचण नसल्याचे मत निवडणूक आयोगाचे आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करता मुंबई, ठाणे, कोकण वगळता उर्वरीत ठिकाणी सप्टेंबरमध्येच निवडणूका होतील,
असा विश्‍वास प्रशासनातील अधिकारी व्यक्त करत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Pune PMC Election 2022 | Prabhag Ward structure unlikely to change after change of power in maharashtra ! Elections for local bodies will be held in September – trust the administrative authorities

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गुन्हे शाखेकडून 25 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नोबेल हॉस्पिटल जवळ कारवाई

Pune Crime | पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक, 20 लाखाचे मेफेड्रॉन जप्त

Pune Crime | वारजे माळवाडी परिसरात गुन्हे शाखेकडून 20 किलो गांजा जप्त

 

Related Posts