IMPIMP

Pune PMC News | महापालिकेची हेल्पलाईन बंद?; पुणेकरांचा महापालिकेच्या कारभारावर संताप

by sachinsitapure
Pune PMC

पुणे: Pune PMC News | पावसाच्या अगदी तासाभराच्या हजेरीत पुण्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. शनिवारी झालेल्या पावसात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळावी. महापालिकेने पावसाळी कामे केल्याचा दावा फोल ठरला आहे. (Rain In Pune)

ड्रेनेजलाईनची कामे झालीच नसल्याने थेट नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अनेक भागातील नाले, ओढे बुजवले असून त्यावर बांधकामे, अतिक्रमण झाल्याने पावसाच्या पाण्याला वाट मिळत नसल्याने अनेक भागात पाणी साचत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (PMC Helpline)

संकटकाळात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत मिळेल, या अपेक्षेने नागरिक महापालिकेच्या १८००१०३०२२२ या हेल्पलाईनच्या नंबरवर संपर्क साधतात. मात्र ही हेल्पलाईन केवळ सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंतच कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ११ नंतर आपत्ती ओढवल्यास नागरिकांना महापालिकेची मदत लाभत नाही. अशावेळी त्यांची मोठी दैना उडते. यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

या हेल्पलाईनचा क्रमांक सोडून महापालिकेच्या संकेतस्थळावर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ०२०-२५५०६८००, ०२०-२५५६८०१ हे क्रमांक दिलेले आहेत. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर फोनच लागत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

“महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संपर्कासाठी दिलेले क्रमांक सुरु आहेत. शहरातील अनेक नागरिकांनी फोनवरुन तक्रारी दिल्या आहेत. त्या सोडविण्याचे काम सुरु आहे. पालिकेचे कर्मचारी २४ तास सेवा देत आहेत.

काही तांत्रिक अडचणीमुळे फोन लागला नसावा. कंट्रोल रुममध्ये आलेल्या प्रत्येक फोनला कर्मचारी प्रतिसाद देतात. एखाद्या नागरिकाला वेगळा अनुभव आला असेल”, अशी प्रतिक्रिया गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुख, पुणे महापालिका यांनी दिलेली आहे.

Related Posts