IMPIMP

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’ ! 55 जणांना कारवाई; 31 कोयते, 4 तलवार, 1 पालघन, 1 सुरा जप्त

by nagesh
Pune Crime | Pune criminals Ganesh Chaudhary and Ajay Vishwakarma are deported from Pune district for two years

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने संयुक्त कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) राबवण्यात आले. कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) दरम्यान सराईत गुन्हेगारांची तपासणी करुन प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive action) करण्यात आली. तसेच विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या 37 जणांवर गुन्हे दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली असून 31 कोयते, 4 तलवार, 1 पालघन, 1 सुरा जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बुधवारी (दि.11) रात्री नऊ ते गुरुवारी (दि.12) मध्यरात्री 1 च्या दरम्यान केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी परिमंडळचे पोलीस उपायुक्त व गुन्हे शाखेचे उपायुक्त यांना गुन्हेगार चेक करुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ते 5 व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी कोंबिंग ऑपरेशन केले. तसेच पोलीस स्टेशन (Police station) व गुन्हे शाखेने (Crime Branch) अधिकारी व अंमलदार यांची पथके स्थापन करुन पुणे शहरातील वेगवेगळ्या परिसरात बुधवारी रात्री धडक कारवाई केली.

 

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान परिमंडळ निहाय पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकूण 2389 गुन्हेगार चेक केले.
त्यापैकी 819 गुन्हेगार मिळून आले आहेत.
प्रतिबंधक कारवाईत एकूण 308 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली.
तसेच पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण 417 हॉटेल, लॉज तपासण्यात आले.

 

हडपसर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टप्रमाणे (Arm Act) गुन्हा दाखल करुन एकाला अटक करण्यात आली.
त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले.
तसेच 37 केस करुन 37 आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून 31 कोयते, 4 तलवार, 1 पालघन, 1 सुरा असा एकूण 9320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

गुन्हे शाखेने 3 व पोलीस स्टेशनने 6 अशा एकूण 9 तडीपार आरोपींना ताब्यात घेतले.
युनिट 6 च्या पथकाने दरोड्याच्या तयारी असलेल्या 5 आरोपींना अटक केली.
त्यांच्यकडून 1 मोपेड, धारदार शस्त्र असा एकूण 78 हजार 086 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याशिवाय एनडीपीएस अ‍ॅक्ट (NDPS Act) नुसार 2 केसमध्ये 3 आरोपींना अटक करुन
त्यांच्याकडून 31 हजार 100 रुपये किंमतीचा 2 किलो 535 ग्रॅम गांजा जप्त केला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Pune Joint Commissioner of Police Dr. Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale), अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग संजय शिंदे (Additional Commissioner of Police Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Additional Commissioner of Police Namdev Chavan), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police Srinivas Ghadge), परिमंडळ -1 चे पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे (deputy commissioner of police Dr. priyanka narnaware), परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त सागर पाटील (deputy commissioner of police Sagar Patil), परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (deputy commissioner of police Purnima Gaikwad), परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख (deputy commissioner of police Pankaj Deshmukh), परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (Namrata Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Police Combing Operation | Pune police’s ‘combing operation’ on the backdrop of Independence Day! Action against 55 people; 31 coyotes, 4 swords, 1 palghan, 1 sura confiscated

 

हे देखील वाचा :

Mumbai High Court | पुण्यातील महत्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प व्यवहार्य आहे का? – उच्च न्यायालयाचा सवाल

Dowry in Rural India | हुंडा देऊन झाले ग्रामीण भारतात 95% विवाह, डोळे उघडणारा जागतिक बँकेचा ‘हा’ अहवाल – स्टडी

Buldhana RTO | मोटार वाहन निरीक्षक लाच घेतायत की दंड वसूल करतायत?

 

Related Posts