IMPIMP

Pune Police | सराईत गुंडावर MPDA कायद्याखाली कारवाई, गुंड योगेश गायकवाडची येरवड्यात रवानगी

by nagesh
Pune Crime | suicide by strangulation of a prisoner serving life sentence in yerawada jail

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन तडीपारीसह अनेकदा प्रतिबंधक कारवाया केल्यानंतरही दहशत पसरवित असल्याने पुणे पोलिसांनी (Pune Police) एका सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) कारवाई करुन स्थानबद्ध केले आहे. खडक पोलिसांनी (khadak) त्याची येरवडा कारागृहात (Yerwada Jail) रवानगी केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

योगेश मारुती गायकवाड (वय 25, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
त्याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारामारी करणे, घातक हत्यारे
जवळ बाळगणे, जबरी चोरी करणे, धमकी देणे, महिलांना छेडणे, सामान्य नागिरकांना मारहाण करणे यासारखे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत.
गायकवाड याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी 2019 मध्ये त्याला 1 वर्षासाठी तडीपार (tadipar action) करण्यात आले होते.

 

तडीपार केल्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत काही एक सुधारणा झालेली नव्हती.
योगेश गायकवाड हा तेथील व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांना खंडणी (Ransom) मागणे, नागरिकांना विनाकारण त्रास देणे अशी कृत्ये सातत्याने करीत आहे.
त्याच्या कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असून तक्रारीसाठी कोणी पुढे येत नाही.
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Police Inspector Shrihari Bhairat) यांनी त्याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सादर केला होता.

या प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी त्याला मंजूरी दिली.
खडक पोलिसांनी योगेश गायकवाड याला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

 

 

वर्षभरात 33 जण स्थानबद्ध

गेल्या वर्षभरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत 33 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्ये स्थानबद्ध केले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) , सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Joint Commissioner Dr. Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Additional Commissioner of Police Dr. Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे (Deputy Commissioner of Police Dr. Priyanka Narnaware), सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (Assistant Commissioner of Police Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, निरीक्षक हर्षवर्धन गाडे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, राहुल खंडाळे, पोलीस अंमलदार नितिन जाधव, विशाल जाधव, तेजस पांडे, किरण शितोळे यांनी हा प्रस्ताव तयार केला होता.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : pune police | panic after tadipars action goons are lodged yerawada jail

 

हे देखील वाचा :

Malicious Apps | यूजर्सला ‘मूर्ख’ बनवून सहज फोनमध्ये हॅकिंग करताहेत ‘ही’ अ‍ॅप्स, Google ने प्ले स्टोअरवरून केली डिलिट; वाचा यादी

Anti Corruption Nashik | लाचखोर महिला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकारांकडे कोटयावधीची संपत्ती, जाणून घ्या

Maharashtra Corona | पुण्यासह ‘या’ 7 जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली, आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यापेक्षा अधिक

Customs Department Pune Recruitment-2021 | पुणे सीमाशुल्क विभागात अनुभवी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts