IMPIMP

Pune Police | ‘मोक्का’तील फरार ‘तुफानसिंग’ला कर्नाटकातून अटक, विशेष शाखेच्या स्पेशल सेलची कारवाई

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Police | वीट आणि वाळु सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकाने जागा खाली करण्यास आणि खंडणी (Ransom) देण्यास नकार दिल्याने तलवारीने डोक्यात वार केल्याची घटना पुण्यात एप्रिल 2021 मध्ये घडली होती. या गुन्ह्यातील पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली होती. यापैकी दोन आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या (Pune Police special branch) स्पेशल सेलने (Special cell) एका आरोपीला कर्नाटकातून (Karnataka) अटक (Arrest) केली आहे.

तुफानसिंग कर्तारसिंग टाक Tufansingh Kartarsingh Tak (वय -32) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.
पुणे पोलिसांनी अवतारसिंग कर्तारसिंग टाक, जपान सिंग कर्तारसिंग टाक, सोरनसिंग कर्तारसिंग टाक (सर्व रा. तुळजाभवानी वसाहत, कॅनॉल जवळ, हडपसर) यांना यापूर्वीच अटक केली आहे.
तर ओंकारसिंग कर्तारसिंग टाक आणि तुफानसिंग कर्तारसिंग टाक हे फरार झाले होते.
त्यामुळे मोक्का न्यायालयाने (Mocca court) त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट (Arrest warrant) काढले होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष शाखेच्या स्पेशल सेलचे एक पथक तयार करण्यात आले होते.
पोलीस आरोपींचा चार महिन्यापासून शोध घेत होते.
गुन्हयाच्या सखोल तपासाअंती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांना आरोपी तुफानसिंग हा कर्नाटकातील विजापुर येथे असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विजापूर येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन अटक करुन पुण्यात आले.
आरोपीला मोक्का न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), स्पेशल सेलचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार
(ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अब्दुलकरीम सय्यद (PSI Abdulkarim Sayyed), सहायक पोलीस फौजदार अनिल घाडगे, विजय भोसले,
दिलीप भोंग, दत्तात्रय शेळके, पोलीस हवालदार राजु रणसिंग, पोलीस नाईक सुहास कदम
यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार करीत आहेत.

 

Web Title : Pune Police | special branch of pune police arrested Fugitive Tufansingh tak from Karnataka who was abscond in mcoca, action taken by Special Cell acp sunil pawar

 

हे देखील वाचा :

Junner News | खोट्या शिवभक्त ‘अक्षय बोऱ्हाडे’वर पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

Ahmednagar News | दुर्दैवी ! TV ची केबल जोडताना शॉक बसून तरुण गोळाफेकपटूचा मृत्यू

Mumbai Police | YouTube चॅनेलचा संचालक मुंबई पोलिसांच्या ताब्यात, 50 लाखांचे चरसही जप्त

 

Related Posts