IMPIMP

Pune Police-Terrorist Attack Mock Drill | पुणे पोलीस 24 x 7 अलर्ट ! मुंढव्यात कोपा मॉल येथे दहशतवाद विरोधी मोक ड्रिल, पुणेकरांनी अनुभवला ‘थरार’ (Videos)

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Police-Terrorist Attack Mock Drill | मुंढव्यातील कोपा मॉल (KOPA Mall Mundhwa Pune) येथे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवहार सुरु होते. नागरिक खरेदी करण्यात व्यस्त असताना अचानक मॉलमध्ये दहशतवादी घुल्याचे समजले. त्यामुळे नागरिकांमध्ये पळापळ झाली. याबाबत मुंढवा पोलीस (Mundhwa Police Station) आणि पुणे पोलिसांच्या क्युक रिस्पॉन्स टीमला Quick Response Team Pune (QRT Pune Police) माहिती देण्यात आली. त्यानंतर पथकांकडून परिस्थिती हातळण्यासाठी धाडसी कारवाई करण्यात आले. मात्र, मॉलमध्ये कोणताही दहशवादी शिरला नसून पुणे पोलिसांचे हे मॉक ड्रिल असल्याचे समजाच नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. परंतु, पुणे पोलिसांनी यातून आपली सतर्कता दाखवून दिली.

मुंढवा पोलीस स्टेशन आणि क्युक रिस्पॉन्स टीमकडून शुक्रवारी (दि.29) सकाळी साडे अकरा ते साडे बारा या दरम्यान कोपा मॉलमध्ये दहशतवाद विरोधी मोक ड्रिलचे प्रत्यक्षिक घेण्यात आले. पुणे शहरामध्ये अतंकवादी घटना घडल्यानंतर पोलीस कशा प्रकारे परिस्थिती सक्षमपणे हाताळू शकतात हे नागरिकांना या माध्यमातून दाखवून दिले. पुणे पोलिसांचे प्रात्यक्षिक बघून पुणेकरांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. पुणे पोलिसांचे धाडस, युद्ध कौशल्य परिस्थिती हताळण्यासाठी करावी लागणारी कसरत पुणेकरांना प्रत्यक्ष पाहता आली.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), सह आयुक्त प्रवीण पवार (IPS Pravin Pawar), अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), परिमंडळ -5 पोलीस उपायुक्त आर. राजा (DCP R. Raja) यांनी मुंढवा येथे गजबलेल्या कोपा मॉल या ठिकाणी मुंढवा पोलिसांना मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या. यावेळी मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi) व त्यांच्या पथकाकडून क्युक रिस्पॉन्स टीम समवेत हा मॉक ड्रिल घेण्यात आला.

Related Posts