IMPIMP

Pune Rain | पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी, हवामान खात्याचा इशारा

by nagesh
Rain In Maharashtra | it will rain in maharashtra between 11th and 14th december due to west bengal cyclone

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन गणपती बाप्पाच्या आगमनाला (Ganeshotsav 2022) अवघे काही तास शिल्लक राहिले असून बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. अशातच पुण्यासह राज्यात गणपती बाप्पाच्या स्वागताला पाऊस (Pune Rain) देखील हजेरी लावणार आहे. पुणे शहर (Pune Rain) आणि परिसरात हलक्या (Light) ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची (Moderate Rain) शक्यता आहे. याशिवाय कोकणासह (Konkan) कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara) जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याची माहित भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान पुणे जिल्ह्यात पावसासह (Pune Rain) उन्हाच्या ही झळा बसण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसांत 30 डिग्रीच्या पुढे तापमान (Temperature) राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (Meteorology Department) दिली आहे. 2 सप्टेंबरपर्यंत पुणे शहरातील दिवसाच्या सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. सर्वोच्च तापमान 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

 

 

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि परिसरात विशेषत: दुपारी किंवा संध्याकाळी उच्च तापमानामुळे वादळी वारे, विजांचा कडकडाटासह (Thunderbolt) जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच पुढच्या 48 तासांत तापमानात वाढ होऊन पावसाची शक्यता आहे.
तापमानात वाढ झाल्याने 30 आणि 31 ऑगस्ट रोजी जोरदार वारे आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
यामुळे प्रवाशांनी हवामान अंदाज घेऊन बाहेर पडणे योग्य ठरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी सांगितले
की, पुण्यात पुढच्या दोन दिवसांत साधारणपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
तर सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढेल.

 

Web Title :- Pune Rain | rain attends arrival of ganesh in maharashtra along with pune

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | आता सर्व राजकीय प्रदूषण बाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा (व्हिडिओ)

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; लग्नाविषयी विचारल्यावर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

Kamal Khan | वादग्रस्त ट्विटप्रकरणी अभिनेता कमाल खानला विमानतळावरुन अटक

 

Related Posts