IMPIMP

CM Eknath Shinde | आता सर्व राजकीय प्रदूषण बाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा (व्हिडिओ)

by nagesh
 Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | aaditya thackeray says people dont go to eknath shinde rally

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन उद्या विघ्नहर्त्याचे आगमन (Ganeshotsav 2022) होत असून त्याने राज्यावरील विघ्न दूर केली आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे (Metro project) वातावरणातील प्रदूषण कमी होईलच याशिवाय राजकीय प्रदूषणही (Political Pollution) कमी होणार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मेट्रो-3 च्या चाचणीला (Mumbai Metro-3) हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भाषणात विरोधकांवर फटकेबाजी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरे कारशेडच्या (Aarey Car Shed) मुद्यावरुन वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो-3 ची ट्रायल रन (Trial Run) अखेर आज आरेतील सारीपूतनगर येथे पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Former Environment Minister Aditya Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, उद्या विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन होत आहे. पण बाप्पा येण्याआधीच मुंबईकरांसमोरील मोठं विघ्न आज दूर झालं आहे. आता मेट्रो-3 कामात कोणतंही विघ्न येणार नाही. सर्वसामान्य जनतेचा फायदा लक्षात घेऊन इन्फ्रास्ट्रक्चरबाबत सकारात्मक निर्णय घेणारं हे सरकार आहे. मेट्रो-3 ही मुंबईकरांची नवी लाइफलाइन ठरणार आहे. त्यामुळे जनतेच्या फायद्याचा निर्णय घेणार सरकार आलं आहे. या मेट्रोमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा कांगावा केला गेला. पण आता सर्व राजकीय प्रदूषण बंद झालं आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

 

पर्यावरणाचा समतोल राखणे हे सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याची सर्वांनाच काळजी आहे. काही विशिष्ट लोकांनाच याची काळजी आहे असं नाही. या ठिकाणी तीन रस्ते आहेत. ज्या पद्धतीने पर्यावरणाच्या ऱ्हासाचा दावा केला गेला तसं काहीच झालेलं नाही. जंगलात जाऊन पूर्णपणे वृक्षतोड झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकल्पाची स्थगिती आम्ही उठवली आणि काम सुरु केले. लोकांच्या हितासाठी असणारे सर्व प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कमी चेंडूत अधिक धावा करायच्या आहेत
आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय फटकेबाजी देखील केली.
त्यांनी म्हटले की, विघ्नहर्त्याने राज्यावरील विघ्न दूर केली आहेत, आता चिंता वाटण्याचे कारण नाही.
या प्रकल्पामुळे आता राजकीय प्रदूषणही बंद होईल असे त्यांनी म्हटले.
आता पूर्ण बॅटिंग करण्यासाठी अडीच वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे आता कमी चेंडूत अधिक धावा करायच्या आहेत.
अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी आता आव्हानाची चिंता करु नये.
आम्हीदेखील सगळी आव्हाने पार करत हे नवीन सरकार स्थापन केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | mumbai metro 3 trial run cm eknath shinde attacks aditya thackeray and uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; लग्नाविषयी विचारल्यावर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

Kamal Khan | वादग्रस्त ट्विटप्रकरणी अभिनेता कमाल खानला विमानतळावरुन अटक

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | नाशिक आदिवासी विभागात चाललंय काय? आणखी एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; चक्क टॉयलेटमध्ये घेतली लाच

 

Related Posts