IMPIMP

Pune Uttam Nagar Crime | पुणे : भररस्त्यात व्यावसायिकाला लुटणाऱ्या स्वयंघोषित दोन भाईंना अटक

by sachinsitapure

पुणे : Pune Satara Road Crime | एका 54 वर्षाच्या व्यक्तीने मुलीच्या शरीराला अश्लील स्पर्श करुन विनयभंग (Molestation Case) केला. याचा जाब विचारणाऱ्या मुलीच्या आईला मारहाण करुन जखमी केले. तर महिलेला मदत करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला देखील मारहाण केली. हा प्रकार सातारा रोडवरील आदिनाथ कॉम्प्लेक्स (Adinath Shopping Complex ) येथील झेरॉक्स सेंटर येथे रविवारी (दि.17) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन किशोर बाळकृष्ण शाळीग्राम Kishore Balkrishna Shaligram (वय-54 रा. केशव कृपा, शिवदर्शन, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सातारा रोड वरील आदिनाथ कॉम्प्लेक्स येथे कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी दुचाकीवरुन जात होते. आरोपीने एका मुलीला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीच्या आईने आरोपीला जाब विचारला असता त्याने महिलेला मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी हे महिलेच्या मदतीसाठी गेले. फिर्यादी यांनी आरोपीला पकडून ठेवले असता त्याने फिर्यादी यांच्या तोंडावर मारहाण करुन पळून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

घरात घुसून तरुणीचा विनयभंग

मुंढवा : एका अनोळखी व्यक्तीने तरुणीच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला.
तसेच मुलीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. हा प्रकार घोरपडी गावातील बालाजीनगर (Balaji Nagar Ghorpadi)
येथे सोमवारी (दि.18) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत 26 वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात
(Mundhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्य़ादी तरुणी तिच्या रुममध्ये आराम करत होती. त्यावेळी आरोपी जबरदस्तीने घरात घुसला.
त्याने मुलीसोबत गैरवर्तन करुन विनभंग केला. तसेच मुलीचा मोबाईल चोरून पळून गेला.
पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.

Pune Parvati Crime | पुणे : अल्पवयीन मुलीला धमकी देऊन बलात्कार, दोघांना अटक

Related Posts