IMPIMP

Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर; आगामी 3 दिवस मुसळधार; पुण्यासह कोकणात Alert

by nagesh
Rain in Maharashtra | weather udpate cyclonic status in bay of bengal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन मागील महिन्यात पावसाने (Rain in Maharashtra) अधिक काळ विश्रांती घेतली. पावसाच्या या विश्रांतीमुळे बळीराजा चिंतेत पडला होता. पावसाचा थेंब न दिसल्याने राज्यात निराशा पसरली. मात्र विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सप्टेंबरच्या प्रारभी सक्रीय झाला. गेल्या काही दिवसापासुन महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) पावसानं चांगलाच वेग घेतला. मागील 5 ते 6 दिवस राज्यातील काही भागाला पावसाने झोडपुन काढलं आहे. मागील 24 तासातही मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि ठाणे (Thane) भागात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस बरसला आहे. आता मात्र, आगामी 3 दिवसांत महाराष्ट्रात अनेक भागात पावसाचा मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे.
यावरुन आगामी ३ दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
पूर्व विदर्भ (East Vidarbha), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि कोकणात (Konkan) याचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे.
उद्यापासून टप्प्याटप्प्यानं पाऊस विदर्भाकडुन कोकणाकडे सरकणार असुन परिणामी आगामी 3 दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडुन (Indian Meteorological Department) हाय अलर्ट (Hi alert) जारी करण्यात आला आहे.

 

राज्यात पावसाचा (Rain in Maharashtra) जोर वाढताना दिसत आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या 4 जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड,
जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड अशी एकूण 14 जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.
संबंधित जिल्ह्यांत वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार सरी कोसळणार आहेत.
उद्या आणि परवा देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.
उद्या संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार आहे.
8 सप्टेंबर रोजीही कमी अधिक प्रमाणात राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार आहे.

 

Web Title : Rain in Maharashtra | heavy rainfall possible in maharashtra during next 3 days imd give orange alert to pune

 

हे देखील वाचा :

Bank Locker Rules | एखाद्या बँकेत नसेल अकाऊंट तरीसुद्धा मिळेल लॉकरची सुविधा, RBI ने नियमांमध्ये केला बदल; जाणून घ्या

Ram Shinde | अनिल देशमुख यांच्या ठावठिकाण्याबाबत भाजपचे माजी मंत्री राम शिंदेंचा खळबळजनक दावा; म्हणाले…

Murder in Pimpri | प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय, डोक्यात हातोडा घालून चाकूने केले सपासप वार

 

Related Posts