IMPIMP

साखर कारखान्यातील अधिकार्‍याचा बेदम मारहाणीत मृत्यू, राष्ट्रवादीच्या माजी आमदारासह 19 जणांवर गुन्हा दाखल

by pranjalishirish
shocking-sugar-factory-official-beaten-death-former-ncp-mla-prabhakar-gharge-be-sacked

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन – साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आलेल्या एका अधिका-याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यात Sugar factory बुधवारी (दि. 10) ही घटना घडली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी आमदारासह 19 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, 6 जणांना अटक केली आहे.

जगदीप थोरात असे मृत्यू झालेल्या अधिका-याचे नाव आहे. थोरात यांच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारखान्याचे Sugar factory  संचालक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, सहसंचालक मनोज घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे यांच्यासह 19 जणांवर वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, 6 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.

वडूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात हे पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये Sugar factory  प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत होते. साखरेची हेराफेरी केल्याच्या आरोपावरून बुधवारी थोरात यांना कारखान्यात मारहाण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुवारी पहाटे त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी तात्काळ कराडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जोपर्यंत त्यांना मारहाण केलेल्या सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा थोरात यांच्या नातेवाइकांनी घेतला होता, त्यानंतर तणाव निर्माण झाला, रात्री उशिरा वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात थोरात यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रात्री नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.

Also Read : 

SpiceJet च्या प्रवाशांनो, आता फक्त 299 रुपयांत करा कोरोना टेस्ट तेही घरबसल्या !

Related Posts