IMPIMP

ACB Trap News | 1 लाखाची लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक (API), सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure
ACB Trap News | Assistant Police Inspector API Assistant Police Sub-Inspector  ASI caught in anti-corruption net while accepting Rs 1 lakh bribe

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन –परमिट रुममधुन दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी करुन एक लाख रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्यातील (Aundh Police Station) सहायक पोलीस निरीक्षक (API) व सहायक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. सातारा एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई खटाव तालुक्यातील औंध येथील जुना एसटी स्टँड, बाजार पटांगणात केली. या कारवाईमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे (API Dattatraya Parashuram Darade), सहायक पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब नारायण जाधव ASI Bapusaheb Narayan Jadhav (वय 54) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत 42 वर्षीय व्यक्तीने सातारा एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली होती.

तक्रदार यांच्या परमिट रुम (Permit Room) मधुन दारुची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल आहे. दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायात इथुन पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी औंध पोलीस ठाण्यातील एपीआय दत्तात्रय दराडे आणे एएसआय बापुसाहेब जाधव यांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी (Demanding a Bribe) केली. तडजोडी अंती एक लाख रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सातारा एसीबी (Satara ACB Trap News) कार्यालयात तक्रार केली.
प्रप्त तक्रारीची पडताळणी केली असता दराडे आणि जाधव यांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी कडून तडजोडी
अंती एक लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
लाचेची रक्कम औंध येथील जुना एसटी स्टँड येथील बाजार पटांगणात देण्याचे ठरले.
त्यानुसार पथकाने बाजार पटांगणात सापळा रचला.
एपीआय दत्तात्रय दराडे यांच्यावतीने एएसआय बापुसाहेब जाधव यांना एक लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
दोघांवर औंध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB)
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा एसीबी पोलीस उपअधीक्षक उज्वल अरुण वैद्य (DySP Ujwal Arun Vaidya)
पोलीस अंमलदार निलेश चव्हाण, तुषार भोसले, निलेश येवले यांच्या पथकाने केली.


Web Title : ACB Trap News | Assistant Police Inspector API Assistant Police Sub-Inspector  ASI caught in anti-corruption net while accepting Rs 1 lakh bribe

Related Posts