IMPIMP

Mayor Naresh Mhaske | …म्हणून ठाण्याचे महापौर राज्यभर ठरले चर्चेचा विषय, जाणून घ्या

by sikandershaikh
thane-mayor-naresh-mhaske

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)केंद्र सरकार तसंच राज्य सरकारने जारी केलेल्या कोविड लस नियमानुसार सर्वांत आधी पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना कोविडची लस देण्यात यावी, असं सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर, ठाण्याचे महापौर सध्या चर्चेत आले आहेत. कारण, ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के (mayor naresh mhaske) आणि ठाण्यातील शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांना लस घेण्याची घाई केली होती, असं दिसत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, आपण फ्रंट लाईन वर्कर आहोत, कोरोना काळात आम्ही देखील रस्त्यावर उतरुन काम केलं आहे. मग आम्ही करोना लस घेतली तर काय बिघडले असं धक्कादायक वक्तव्य महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेने ठरवलं, त्यामुळे मी लस घेतली असं देखील महापौर नरेश म्हस्के म्हणाले आहेत. मात्र, पालिकेने असं काहीही ठरवलं नाही, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सध्या राज्यात महापौर नरेश म्हस्के यांची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महापौर नरेश म्हस्के फ्रंटलाईन वर्कर सोबतच लोकप्रतिनिधींनाही
लस द्यावी अशी मागणी २ डिसेंबर रोजी केली होती. मात्र, ती पूर्ण झालेली नाही.
त्यानंतर आता तर थेट नरेश म्हस्के यांनी कोविड लस घेतली. तर विरोधी पक्ष भाजपला यामुळे आयतं कोलीत मिळालं आहे.

कोरोनाकाळात नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौरांनी कोरोनाची लस आमदार रवींद्र फाटक यांच्यासह सर्वांआधी घेतल्यावरून डुंबरे यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
सत्ता आणि पदाचा गैरवापर करत या दोघांनी स्वार्थीपणे लस तर घेतलीच उलट त्याचे फोटोसेशन करत
नागरिकांमध्ये चुकीचा संदेश पोहोचवला आहे, अशी टीका मनोबर डुंबरे यांनी केली आहे.
‘असा महापौर आतापर्यंत झाला नाही… होणार नाही,’ अशा शेलक्या शब्दात ठाणे महानगरपालिकेतील
भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (mayor naresh mhaske) यांच्यावर टीका केली आहे.

Related Posts