IMPIMP

Gold Price Update | सोन्यात मोठी घसरण, जाणून घ्या आता किती रूपयांना मिळतंय 1 तोळा सोने

by nagesh
Gold Price Today | gold price today gold and silver prices are showing a rise today check the latest rate 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्यात दुसर्‍या दिवशी मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Update) नोंदली गेली. हा लागोपाठ पाचवा दिवस आहे जेव्हा सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली आहे. मंगळवारी सोन्याचा दर 88 रुपयांच्या घसरणीसह 47,005 रुपये प्रति 10 ग्रॅमवर राहिला. मंगळवारी चांदीचा दर 59 रुपयांच्या घसरणीसह 63,240 रुपये प्रति किलोवर राहीला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सोने 9137 आणि चांदी 16924 रुपयांनी स्वस्त

अशाप्रकारे सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून 9195 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च दर ऑगस्ट 2020मध्ये गाठला होता.
त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचले होते.
तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 16740 रुपये प्रति किलोच्या दराने स्वस्त मिळत आहे.
चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

 

 

14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीन दर

सोमवारी भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 47017 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 46829
रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोना 43068 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35263 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27505 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.

 

 

अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची वाटचाल

न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा दर 0.13 टक्केच्या घसरणीसह 1792 डॉलर प्रति औंसवर राहिला.
अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्यात घसरण झाली.
कारण डॉलर निर्देशांक दोन आठवड्याच्या उच्च स्तराजवळ स्थिर होता.

तर गुंतवणुकदार सुद्धा होणार्‍या महत्वाच्या अमेरिकन महागाईच्या आकड्यांपूर्वी सतर्क राहिले.
या दरम्यान गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची होल्डिंग सोमवारी 0.2 टक्के वाढून 1,000.21 टन झाली, जी शुक्रवारी 998.17 टन होती.

 

Web Title : Gold Price Update | gold silver jewelry price rate update 15th september know latest rate indian sarafa market

 

हे देखील वाचा :

तुमचा मोबाइल नंबर बदलला आहे का? तात्काळ Aadhaar Card सोबत करा लिंक, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Pune Crime | पुण्याच्या कोथरूडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीनं केलं पत्नीच्या मोबाईलमध्ये ‘स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर’ सॉफ्टवेअर डाऊनलोड, पुढं झालं असं काही की प्रकरण…

PM Modi | पीएम मोदींनी सांगितलं आपल्या बालपणीचे अलीगढ ‘कनेक्शन’, म्हणाले – ‘वडिलांकडे पैसे ठेवत होता अलीगढचा मुस्लिम व्यापारी’

 

Related Posts