IMPIMP

LIC Micro Bachat Insurance Policy | ‘एलआयसी’च्या ‘या’ पॉलिसीत रोज 28 रुपये बचत केल्यास होईल 2 लाखाचा फायदा; जाणून घ्या कसा?

by nagesh
LIC Micro Bachat Insurance Policy | 2 lakhs rupees benefits invest lic micro insurance plan just rs 28 daily check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Micro Bachat Insurance | ‘एलआयसी’ची मायक्रो बचत विमा योजना (Micro Bachat Insurance Policy) लो इन्कम ग्रुपमधील लोकांसाठी खुप उपयोगी आहे. ज्या लोकांची कमाई कमी आहे, त्यांच्यासाठी LIC चा मायक्रो इन्श्युरन्स प्लान लाभदायक आहे. हे प्रोटेक्शन आणि सेव्हिंगचे कॉम्बीनेशन आहे. हा प्लान अचानक मृत्यू झाल्यास कुटुंबाला फायनान्शियल सपोर्ट देईल. सोबतच मॅच्युअर झाल्यानंतर एकरकमी रक्कम प्रदान करेल. या प्लानबाबत जाणून घेवूयात सर्वकाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

लोनची मिळेल सुविधा

मायक्रो बचत नावाच्या या रेग्युलर प्रीमियमच्या प्लॅनमध्ये अनेक प्रकारचे फिचर्स आहेत. या इन्श्युरन्स प्लॅनमध्ये 50 हजार रुपये ते 2 लाखांपर्यंत विमा मिळेल. हा नॉन लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन आहे. या प्लॅन अंतर्गत पॉलिसीमध्ये लॉयल्टीचा फायदा सुद्धा मिळेल. जर एखाद्याने 3 वर्षापर्यंत प्रीमियम दिला आहे, तर त्यास मायक्रो बचत प्लॅनमध्ये लोनची सुविधा सुद्धा मिळेल.

 

 

कोण घेऊ शकतो प्लॅन?

हा विमा केवळ 18 ते 55 वर्षापर्यंत वयाच्या लोकांना मिळेल. या अंतर्गत कोणत्याही मेडिकल तपासणीची गरज नाही. जर कुणी 3 वर्षापर्यंत नियमित प्रीमियम भरत असेल आणि त्यांनतर प्रीमियम भरू शकत नसेल तर त्यास 6 महिन्यापर्यंत विम्याची सुविधा जारी राहील. जर हा प्रीमियम पॉलिसी होल्डर 5 वर्षापर्यंत भरत असेल तर त्यास 2 वर्षांचे ऑटो कव्हर मिळेल. या प्लॅनचा क्रमांक 851 आहे.

 

 

किती वर्षाची असेल पॉलिसी टर्म?

मायक्रो बचत इन्श्युरन्स प्लॅनची पॉलिसी टर्म 10 ते 15 वर्षांची असेल. या प्लॅनमध्ये वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक आधारावर प्रीमियम भरू शकता. यामध्ये तुम्हाला एलआयसीच्या अ‍ॅक्सीडेंटल रायडर जोडण्याची सुद्धा मिळेल. मात्र, यासाठी तुम्हाला वेगळा प्रीमियम द्यावा लागेल.

 

 

 रोज 28 रुपयात 2 लाखांचा इन्शुरन्स

या अंतर्गत 18 वर्षांच्या वयाची कुणीही व्यक्ती जर 15 वर्षांचा प्लॅन घेत असेल तर त्यास प्रति हजार 51.5 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. तर 25 वर्षांच्या व्यक्तीला याच कालावधीसाठी 51.60 रुपये आणि 35 वर्षांच्या व्यक्तीसाठी 52.20 रुपये प्रीमियम प्रति हजार रुपये द्यावा लागेल. 10 वर्षांच्या प्लॅनमध्ये प्रीमियम 85.45 ते 91.9 रुपये प्रति हजार रुपये असेल. प्रीमियममध्ये 2 टक्क्यांची सूट सुद्धा मिळेल.

जर खरेदी केल्यानंतर तुम्हाला हा इन्श्युरन्स पसंत नसेल तर तुम्ही 15 दिवसांच्या आत हा प्लॅन
सरेंडर करू शकता. जर कुणी 35 वर्षांची व्यक्ती 1 लाख रुपयांची सम अश्योर्ड वाली 15 वर्षांची
पॉलिसी घेत असेल तर त्याचा वार्षिक प्रीमियम 5116 रुपये येईल. चालू पॉलिसीमध्ये 70 टक्केपर्यंत रक्कमेचे लोन मिळेल.

 

 

 हे आहे गणित

जर एखाद्या व्यक्तीने 35 वर्षांच्या वयात पुढील 15 वर्षांसाठी ही पॉलिसी घेत असेल तर त्यास
वार्षिक 52.20 रुपये (1 हजार रुपये विमा राशीवर) प्रीमियम जमा करावा लागेल. अशाच प्रकारे जर
कुणी 2 लाख रुपयांची विमा राशी घेतली तर तिला वार्षिक 52.20 बाय 100 बाय 2 म्हणजे
10,300 जमा करावे लागतील. म्हणजे रोज 28 रुपये आणि महिन्यात 840 रुपयांचा प्रीमियम जमा करावा लागेल.

 

 

प्रीमियम भरताना सेक्शन 80सी अंतर्गत मिळेल सूट

या दरम्यान, लोनवर 10.42 टक्केच्या व्याजदराने व्याज द्यावे लागेल. प्रीमियम भरण्यासाठी 1
महिन्यापर्यंत सूट असेल. या पॉलिसीसाठी मॅच्युरिटीचे कमाल वय 70 वर्ष असेल. ही एक लाईफ
इन्श्युरन्स पॉलिसी आहे. यासाठी तुम्हाला प्रीमियम भरताना सेक्शन 80 सी अंतर्गत इन्कम टॅक्सची
सूट मिळेल.

 

Web Title : LIC Micro Bachat Insurance Policy | 2 lakhs rupees benefits invest lic micro insurance plan just rs 28 daily check details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खळबळजनक ! व्याजाच्या पैशासाठी सावकाराने केली शरीर सुखाची मागणी, बंदूकीच्या धाकावर केला बलात्कार

Central Government | जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? केंद्र सरकारकडून संसदेत माहिती सादर

 

Related Posts