IMPIMP

SBI Alert | टळला मोठा फ्रॉड ! 25 लाखांच्या लॉटरीचा WhatsApp मेसेज आल्यानंतर SBI ने ग्राहकाला असे केले अलर्ट

by nagesh
SBI Tax Saving Scheme | sbi scheme deposit 5 lakhs you will get 6 lakh 53 thousand on maturity with the benefit of tax exemption

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी एसबीआय सातत्याने ग्राहकांना अलर्ट (SBI Alert) करत असते. गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीसोबत शेयर करू नका किंवा लिंकवर क्लिक करू नका अशा सूचना केल्या जातात. एसबीआयच्या एका ग्राहकाला लॉटरीबाबत (Lottery) असाच एक मेसेज आला. या मेसेजचा संशय आल्याने त्याने बँकेला कळवले. यानंतर एसबीआयने प्रतिसाद देत त्या ग्राहकाला योग्य मार्गदर्शन केल्याने संभाव्य फ्रॉड टाळता (SBI Alert) आला.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एसबीआय ट्विटरच्या माध्यमातून ग्राहकांना मार्गदर्शन करते. याचा चांगला अनुभव एका ग्राहकाला आला.
संशयीत मेसेज आल्यानंतर त्याच्या स्क्रीनशॉटसह एसबीआयच्या एका ग्राहकाने याबाबत ट्विट केले. यामध्ये
म्हटले होते की, मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला असून, त्यात मला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे आणि ही रक्कम माझ्या एसबीआय अकाऊंटवर जमा करण्यात येणार आहे. यावर बँकेने उत्तर दिले की, अशा कोणत्याही मेसेजला प्रतिसाद देऊ नये. तसेच ग्राहकांनी आपली वैयक्तिक माहिती शेअर करु नये.

 

 

तुमच्या वैयक्तिक बँक अकाऊंटची माहिती, तसेच युजर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड नंबर, पिन, CVV, ओटीपी अपडेट करण्यास सांगणार्‍या कोणत्याही ई-मेल, टेक्स्ट मेसेज, कॉल्स किंवा एम्बेड लिंकला ग्राहकांनी प्रतिसाद देऊ नये. फिशिंग (Phishing), स्मिशिंग, विशिंग सारख्या घटना घडल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई होण्यसाठी याबाबतची माहिती ई-मेलच्या माध्यमातून [email protected] वर कळवावी. याशिवाय नजीकच्या पोलीस स्टेशनला देखील कळवावे, असे ट्विट करुन सांगितले.

 

 

त्याचप्रमाणे बँकेने म्हटले, ग्राहक सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून बँकेकडे तक्रार
करताना आपली वैयक्तिक माहिती देखील त्यात शेअर करतात. मात्र ग्राहकांनी आपली वैयक्तिक
आणि बँकिंग विषयीची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव सोशल मीडियावरुन शेअर करु नये. यामुळे
ग्राहकांचे नुकसान झाल्यास त्यास बँक जबाबदार नाही. तुम्ही ही पोस्ट तातडीने हटवावी आणि
बँकेशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे बँकेने म्हटले होते.

 

Web Title : sbi alert sbi customer received a lottery message of rs 25 lakhs sbi replied to customer alert

 

हे देखील वाचा :

Dieting | वजन वाढल्यास ‘इथं’ सरकार करून घेते डाएटिंग, न केल्यास भरावा लागतो दंड

Pune Crime | पुण्यात पैशासाठी गर्भश्रीमंत कुटुंबातील 17 वर्षीय तरूणास चौघांकडून बेदम मारहाण

Tokyo olympics 2020 | टोकियो ऑलंपिक ! हॉकीमध्ये भारताची स्पेनवर 3-0 ने केली मात

 

Related Posts