IMPIMP

Mumbai Pune Expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार

by sachinsitapure
Mega Block

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावर दोन तासांचा मेगा ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजता हा ब्लॉक घेतला जाणार असून याकाळात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद (Traffic Stop) राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (पुणे मार्गिका) (Mumbai Pune Expressway) लोणावळा एक्झिट Lonavala Exit (कि.मी क्र.54/225) येथे गॅन्ट्री (Gantry) उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) उद्या (1 सप्टेंबर) करण्यात येणार आहे.

गॅन्ट्री उभारण्याच्या कामासाठी उद्या दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णत: बंद राहील अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (Maharashtra State Road Development Corporation) दिली आहे.

 

Related Posts