IMPIMP

Upcoming IPOs | सप्टेंबरमध्ये येताहेत आणखी 2 कमाईच्या संधी, जाणून घ्या किती रुपयांची करावी लागेल गुंतवणूक?

by nagesh
Business Idea | business idea start laptop mobile repair business earn god income know how to start

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Upcoming IPOs | जर तुम्ही सुद्धा सप्टेंबर महिन्यात एखाद्या आयपीओ (Invest in IPO) मध्ये पैसे लावण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दोन कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. या आयपीओद्वारे गुंतवणूकदार पैसे लावून कमाई करू शकतात. हेल्थकेयर चेन विजया डायग्नोस्टिक सेंटर (Vijaya Diagnostic IPO) आपला आयपीओ (Upcoming IPOs) आणत आहे.

 

एमी ऑर्गेनिक्सचा आयपीओ

याशिवाय केमिकल बनवणारी कंपनी एमी ऑर्गेनिक्स (Ami Organics) चा सुद्धा आयपीओ बाजारात लिस्ट होणार आहे. दोन्ही कंपन्यांचे आयपीओ 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबरपर्यंत ओपन राहतील.

 

Vijaya Diagnostic IPO (विजया डायग्नोस्टिक आयपीओ)

हेल्थकेयर चेन विजया डायग्नोस्टिक सेंटरच्या आयपीओची प्राईस बँड 522-531 रुपये प्रति शेयर ठरवली आहे. ही ऑफर फॉर सेल (OFS) असेल ज्यामध्ये प्रमोटर आणि इन्व्हेस्टर्स 35,688,064 इक्विटी शेयर्स विकतील.

किती गुंतवणूक करावी लागेल – 14616

शेयर प्राईस – 522-531 रुपये

लॉट साईज – 28 शेयर

 

Ami Organics IPO (एमी ऑर्गेनिक्स आयपीओ)

एमी ऑर्गेनिक्सचा इश्यू ओपन होत आहे. इश्यूसाठी शेयरची किंमत 603-610 रुपये असेल. अपर प्राइस बँडसाठी Ami Organics ने आपल्या IPO द्वारे 570 कोटी रुपये जमवण्याची योजना बनवली आहे. या आयपीओमध्ये 200 कोटीचे नवीन शेयर जारी केले जातील. कंपनीने आयपीओची साईज 100 कोटी रुपये कमी आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

किती करावी लागेल गुंतवणूक?

Ami Organics च्या आयपीओसाठी शेयरची किंमत 603-610 रुपये असेल. एक लॉट 24 शेयरचा असेल. 1 लॉट खरेदी आवश्यक आहे. अपर प्राईस बँडच्या हिशेबाने या इश्यूमध्ये किमान 14640 रुपये गुंतवणूक करावी लागेल.

 

किती करावी लागेल गुंतवणूक – 14472

शेयर प्राईस – 603-610 रुपये

लॉट साईज – 24 शेयर

 

Web Title : upcoming ipos vijaya diagnostic centre and ami organics ipo will open for subscription in september

 

हे देखील वाचा :

Earn Money | केवळ एक एकरच्या शेतीत 6 लाख रुपयांची करा कमाई, सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

Modi Government | सरकारने दिला मोठा दिलासा ! TAX संबंधित या सर्व कामकाजाची वाढवली तारीख, जाणून घ्या नवीन कालावधी

Pune Crime | ‘तुझी फिगर चांगलीय, तुझं लग्न झाल्यास मला त्रास नाही, तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’, कोंढव्यात गुन्हा दाखल

 

Related Posts