IMPIMP

Crime News | महिलेचा राडा ! मास्क न घातल्याने आडवणार्‍या पोलिसाला केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पहा Video

by nagesh
Crime News | lucknows cab driver priyadarshini similer case asked for not wearing mask woman beat up

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Crime News | उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ (Lucknow) मध्ये भरस्त्यात कॅब चालकाला मारहाण करणार्‍या मुलीनंतर आता असाच एक दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. दिल्लीच्या पीरागढी मेट्रो स्टेशन (New Delhi’s Peeragarhi Metro Station) च्या जवळ एका महिलेने कोरोना व्हायरसच्या नियमांचे उल्लंघन केल्याने चलान फाडणार्‍या पथकासोबत धक्काबुक्की केली. (Crime News) व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणार्‍या दोन महिलांना अटक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

चलान भरण्यास सांगितल्याने केली हाणामारी

नवी दिल्लीच्या पीरागढी मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. कोरोना व्हायरस नियमांचे उल्लंघन
(Corona virus Guidelines) केल्याने टीमच्या सदस्यांनी जेव्हा दोन महिलांपैकी एकीला फेस मास्क न घातल्याने चलान भरण्यास सांगितले तेव्हा त्यांनी मारहाण केली.
व्हिडिओमध्ये ही महिला अधिकार्‍यांना शिव्या देताना दिसत आहे.

 

 

पोलिसांनी केली कारवाई

पोलिसांनी सांगितले की, पंजाबी बाग एसडीएम कार्यालयात कार्यरत आनंद यांनी 6 ऑगस्टला
तक्रार केली होती की, ते एक अन्य शिक्षक अजमेर सिंह आणि एक नागरिक सुरक्षा कर्मचार्‍यासह
कोविड ड्यूटीवर पीरागढी मेट्रो स्टेशनजवळ तैनात होते.
आणि जेव्हा त्यांनी एका महिलेला मास्क न घातल्याने रोखले आणि चलान भरण्यास सांगितले तेव्हा तिने आपल्या कंपनीच्या माणसाला बोलावले आणि टीमवर हल्ला केला.

 

 

आरोपी महिलांना झाली अटक

पोलीस उपायुक्त परविंदर सिंह यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारावर भारतीय दंड संहिता आणि महामारी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमांतर्गत प्रकरण दाखल करून दोन्ही आरोपी महिलांना अटक केले. पोलिसांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीत मास्क न घातल्याने दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागतो.

 

 

Web Title : Crime News | lucknows cab driver priyadarshini similer case asked for not wearing mask woman beat up

 

हे देखील वाचा :

Bhusawal News | भाजप नगरसेवक राजकुमार खरातसह 5 जण 2 वर्षासाठी तडीपार, राजकीय वर्तुळात खळबळ

Pune Crime | बाईक स्टंक करणे पडले महागात, वीजेच्या खांबाला धडकून गमावला जीव; पुण्यातील घटना

PM Modi | खा. विखे-पाटील यांच्या 10 वर्षाच्या मुलीनं PM मोदींना भेटण्यासाठी केला मेल, ‘धावत ये मुली’ असं उत्तर मिळाल्यानंतर भरपूर विचारले ‘अनिशा’नं प्रश्न

 

Related Posts