IMPIMP

Electric Bike | अवघ्या 7 रुपयांच्या खर्चात 100 किलोमीटरपर्यंत धावते ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, किंमत 50 हजार; जाणून घ्या

by nagesh
Electric Bike atum 1 0 runs 100 km in single charge know complete details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Electric Bike | हैद्राबाद येथील स्टार्टअप कंपनी Atumobile प्रायव्हेट लिमिटेडच्या या इलेक्ट्रिक बाईकचे नाव Atum 1.0 आहे. ती 2020 मध्ये लाँच झाली होती. तिची प्रारंभिक किंमत 49,999 रुपये असून कंपनीच्या वेबसाइटवर ती बुक करू शकता. संपूर्ण भारतात बाईकची (Electric Bike) डिलिव्हरी मिळते.

 

मात्र दिल्लीत ही बाईक खरेदी केल्यास 54,442 रुपये भरावे लागतात. ऑन रोड किंमतीत आरटीओ फी 2,999 रुपये आणि इन्श्युरन्स फी 1,424 रुपये आहे. विविध राज्यात तिची किंमत वेगळी असू शकते.

 

कंपनीनुसार ही एक दमदार इलेक्ट्रिक बाईक आहे. जी या सेगमेंटमध्ये सर्वात परवाडणारी आहे. बाईकमध्ये कंपनीने 47V, 27Ah ची पोर्टेबल लिथियम आयर्न बॅटरी दिली आहे. जिच्यासोबत 250 वॉटची इलेक्ट्रिक मोटर आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

बाईक फुल चार्जसाठी 3 ते 4 तास लागतात. कंपनीनुसार बाईक एकदा फुल चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. यामध्ये 35 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड मिळतो.

 

कंपनीनुसार बाईकचा टॉप स्पीड यासाठी 35 किलोमीटर प्रति तास ठेवला आहे जेणेकरून बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासू नये.

 

बाईकच्या बॅटरीवर 2 वर्षाची वॉरंटी आहे. बॅटरीचे एकुण वजन 6 किलोग्रॅम आहे. कंपनीचा दावा आहे की,
बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी अवघ्या 1 युनिट विजेचा खर्च येतो. यानुसार एकवेळ चार्ज करण्यासाठी अवघा 7
रुपये खर्च येईल ज्यामध्ये ती 100 किलोमीटरची रेंज देईल.

 

Web Title : Electric Bike atum 1 0 runs 100 km in single charge know complete details

 

हे देखील वाचा :

Pune News | नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या संकल्पनेतून धनकवडीत ‘जय हिंद विजय’ शिल्प; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालं लोकार्पण

Bluetooth Security | ALERT ! अँड्रॉईड फोन आणि विंडोज 10 यूजर्सला मोठा धोका! समोर आला नवीन प्रकारचा धोकादायक व्हायरस

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 246 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts