IMPIMP

Google for India 2022 | ‘ट्रांजक्शन सर्च फीचर’पासून ‘डिजिलॉकर’पर्यंत, गुगलचे CEO सुंदर पिचाई यांच्या मोठ्या घोषणा

by nagesh
Google for India 2022 | google for india 2022 google ceo sundar pichai and ashwini vaishnaw

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google for India 2022 | दिल्लीच्या प्रगती मैदानावर सोमवारी गुगलचा सर्वात मोठा इव्हेंट Google for India 2022 मध्ये
कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) सहभागी झाले. यावेळी त्यांनी भविष्याबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पिचाई म्हणाले, आम्ही UPI स्टॅकच्या आधारावर भारतात गुगल-पे बनवले आहे. शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मॉडलवर सुद्धा काम करत
आहोत. हे हजारो भाषेत माहिती देऊ शकते, हे याचे वैशिष्ट्य आहे.

 

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) सुद्धा उपस्थित होते. पिचाई आणि वैष्णव यांच्यात भारतात AI आणि AI बेस्ड
सोल्यूशनवर चर्चा झाली. यानंतर कार्यक्रमात सुंदर पिचाई यांनी गुगलच्या आगामी सुविधांबाबत घोषणा केल्या. (Google for India 2022)

 

डिजिलॉकर
कार्यक्रमात अँड्रॉइड फोन यूजर्ससाठी नवीन सुविधेची घोषणा करण्यात आली. यामुळे यूजर्स गुगल फाइल्स अ‍ॅपद्वारे डिजिलॉकर वापरू शकतील.

 

डिजिलॉकर लॉकर म्हणजे काय –
डिजिलॉकर एक प्रकारचे व्हर्चुअल लॉकर आहे. यामध्ये कागदपत्र पेपरलेस फॉर्मेटमध्ये ठेवू शकता. डिजिलॉकरमध्ये सेव्ह डॉक्युमेंट्स पूर्णपणे वैध  आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नवीन ट्रांजक्शन सर्च फीचर
गुगल-पे ने नवीन ट्रांजक्शन सर्च फीचर लाँच केले आहे. यामुहे व्हॉईसद्वारे यूजर्स आपल्या ट्रांजक्शनबाबत जाणून घेऊ शकतील..

 

काय आहे ट्रांजेक्शन सर्च फीचर –
हे फीचर संशयास्पद ट्रांजक्शनसाठी जास्त सिक्युरिटी अलर्ट आणि इशार देईल, जो प्रादेशिक भाषेत सुद्धा असेल. हे एमएल एल्गोरिदमचा वापर करते.

 

व्हिडिओमध्ये ‘सर्च फैसिलिटी’
गुगल कोणत्याही व्हिडिओमध्ये ‘सर्च फॅसिलिटी’चे टेस्टिंग करत आहे. सर्च इन व्हिडिओ फीचरद्वारे तुम्हाला तुमची क्वेरी टाईप करावी लागेल आणि व्हिडिओमध्ये तुम्ही अगदी त्या ठिकाणी पोहचाल जो तुम्ही शोधत आहात.

अगोदर होते हे ऑपशन – व्हिडिओमध्ये कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी अगोदर केवळ सीकचे ऑपशन होते..

२०२३ पासून यूट्यूबवर नवीन सुविधा ‘कोर्सेस’
यूट्यूब २०२३ पासून ‘कोर्सेस’ ची नवीन सुविधा सुरू करणार आहे, ज्यामुळे यूजरचे लर्निंग आणि जास्त इंटरॅक्टिव होईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे ‘कोर्सेस’ सुविधा –
यूजर्सला स्ट्रक्चर्ड लर्निंग एक्सप्रियन्स प्रदान करण्यासाठी क्रिएटर्स फ्री आणि पेड कोर्सेस सादर करू शकतील. ते व्हिडिओ अ‍ॅड-फ्री पाहू शकतील.

 

मोफत ‘कंटेंट डब’
पिचाई यांनी सांगितले की, ‘अलाउड’ एक नवीन एआय, एमएल प्रॉडक्ट आहे. हे ओरिजिनल कंटेंट कोणत्याही अ‍ॅडिशनल कॉस्टशिवाय डब करू शकते.

 

काय आहे कंटेट डब –
ही सुविधा विशेष करून हेल्थ बेस्ड क्रिएटर्स आणि पार्टनर्ससाठी आणली जात आहे. यूजर्स यातून व्हिडिओ एका वेगळ्या ऑडिओ ट्रॅकमध्ये टुगल करू शकतील.

 

इंडिया फर्स्ट इनोव्हेशन अँड फीचर
आता सर्च रिजल्ट पेजेस फीचर भारत बायलँग्युअल होईल. येत्या काही दिवसात तामिळ, तेलगु, मराठी आणि बंगाली भाषांना सुद्धा हे फीचर सपोर्ट करेल.

 

काय आहे ‘इंडिया फर्स्ट इनोव्हेशन अँड फीचर’ –
हे एक व्हॉईस सर्च फीचर असेल जे त्या लोकांना सुद्धा चांगले समजू शकते, जे इंग्लिश बोलतात.

 

हँडरायटिंग वाचणार गुगल
गुगलने हँडरायटिंग डिकोड करणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची घोषणा केली आहे. ही टेक्नॉलॉजी हँड रायटिंग स्कॅन करेल. सोबतच यूजरला सांगेल की अखेर काय लिहिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Google for India 2022 | google for india 2022 google ceo sundar pichai and ashwini vaishnaw

 

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘चिंता करू नका, भाजप ग्रामपंचायतींच्या निकालात बाजी मारेल’ – देवेंद्र फडणवीस

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन जबरी चोरी करणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांकडून अटक

Winter Session 2022 | सत्ताधाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात घेरण्यासाठी खास ठाकरे ‘नीती’; आयोजित केली आमदारांची खास बैठक…

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

 

Related Posts