IMPIMP

Gmail Alert | तुम्हालाही असा ‘ई-मेल’ आला असेल तर व्हा सावधान, अन्यथा …

by nagesh
gmail alert spam links send by hackers beware of this new cyber crime vishing fraud

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gmail Alert | जीमेल अकाउंट युजर्ससाठी एका नव्या ईमेल फ्रॉडने नवीन समस्या निर्माण केली आहे. त्यामुळे युजर्सला या धोकादायक जीमेल स्पॅमपासून (Spam) सावध राहणाचा इशारा (Gmail Alert) देण्यात आला आहे. हा ईमेल फ्रॉड (Email fraud) भारतासह जगभरात होत असल्याने युजर्सच्या अडचणीत वाढ होत आहे. युजर्सची फसवणूक (Cheating) करण्यासाठी सायबर चोरट्यांनी या नव्या पद्धतीचा अवलंब केला आहे.

जीमेल फ्रॉड करण्यासाठी स्कॅकर्स आता असे मेल पाठवत आहेत. जे अ‍ॅमेझॉन (Amazon) किंवा PayPal सारख्या मोठ्या कंपन्यांच्या नावे येतात. या ईमेलमध्ये युजरच्या अकाउंटवर नुकतीच मोठी खरेदी केल्याचा दावा केला जातो. ही खरेदी रोखण्याचा कोणताही उपाय नाही. ही ऑर्डर कॅन्सल (Order cancel) करण्यासाठी युजरला केवळ फोन कॉल करावा लागेल. असे या ईमेलमध्ये सांगितले जाते. या मेलमध्ये एक फोन नंबर देखील दिला जातो. या मेलमध्ये लिहिलेलं असतं, की जर तुम्ही अद्याप याची खरेदी केली नसेल, तर आम्हाला कॉल करा. तुम्हाला फोनवर कनेक्ट केलं जाईल, असंही सांगितलं जाते. फोनशी कनेक्ट झाल्यानंतर फ्रॉड व्यक्ती तुमच्या अकाउंटची माहिती, बँकेची माहिती आणि पासवर्ड विचारतो. अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं जातं. परंतु पैसे युजरच्या अकाउंटमध्ये न जाता बनावट अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर होतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याला Vishing Fraud म्हटले जाते

अशा पद्धतीने करण्यात येणाऱ्या फ्रॉडला Vishing Fraud असे म्हटले जाते. Kaspersky ने दिलेल्या माहितीनुसार, फ्रॉड करण्यासाठी स्कॅमर्सकडून युजर्सला नकली, बनावट लिंक पाठवण्याची मोठी समस्या आली आहे. अनेक स्पॅम ईमेलची माहिती मिळाली असून हे ईमेल बड्या कंपन्यांच्या नावाने पाठवले जातात. तर फ्रॉडप्रमाणे हा ईमेल अधिकृत फॉन्ट आणि लोगोचा वापर केलेल्या मेसेजसह येतो. त्यामुळे युजरला हा मेल अगदी खराच असल्याचे वाटते. त्यामुळे मेल किंवा इतर ठिकाणीही आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.

 

Web Title : gmail alert spam links send by hackers beware of this new cyber crime vishing fraud

 

हे देखील वाचा :

Jan Dhan खातेधारकांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार लवकर करू शकते घोषणा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा?

Pune News | महात्मा बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठाण ट्रस्टकडून कात्रज परिसरात श्रावण सोमवारचे औचित्य साधून विविध कार्यक्रम

Miss Heritage India | मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया’ किताब

 

Related Posts