IMPIMP

Dizo Smartwatch | ‘डीझो’ने भारतात लाँच केल्या 2 बेस्ट स्मार्टवॉच; काय आहे किंमत? जाणून घ्या

by nagesh
Dizo Smartwatch | dizo watch 2 and dizo watch pro launched price specs and other details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Dizo Smartwatch | भारतात डिझो या ब्रॅंड कंपनीने नवे 2 स्मार्टवॉच लाँच (Dizo Smartwatch) केले आहेत. भारतात ही कंपनी आपल्या प्रोडक्ट्सची रेंज वाढवताना दिसत आहे. सध्या लाँच केलेल्या स्मार्टवॉचमध्ये ‘Dizo Watch 2’ आणि ‘Dizo Watch Pro’ हे दोन आहेत. Dizo Watch 2 क्लासिक ब्लॅक, गोल्डन पिंक, आइव्हरी व्हाइट आणि सिल्वर ग्रे कलरमध्ये आहे. याची किंमत केवळ 1.999 रुपये आहे. आणि Dizo Watch Pro ब्लॅक, स्पेस ब्लू रंगात येते. त्याची किंमत 4.499 रुपये आहे. सध्या लाँच झालेले दोन्ही स्मार्टवॉच हे 22 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

1. ‘Dizo वॉच 2’ चे फीचर आणि स्पेसिफिकेशन्स…

– कंपनीने 1.69 इंचाचा TFT LCD पॅनेल दिला आहे. 5 एटीएम वॉटर रेसिस्टेंट या वॉचमध्ये मेटॅलिक बॉडी दिली असून, यामुळे लुक अधिक आकर्षक वाटतो. वॉचमध्ये 1 हजार रुपयांपेक्षा अधिक वॉच फेस मिळतात.

– 260 एमएएचची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये बॅटरी 10 दिवस टिकेल. फिटनेस ट्रेकिंगसाठी यात हार्ट रेट ट्रॅकर, SpO2 मॉनिटर आणि स्लीप मॉनिटरसह 15 स्पोर्ट्स मोड मिळतात. याशिवाय यामध्ये म्यूझिक कंट्रोल, कॅमेरा कंट्रोल, एक्सेप्ट/रिझेक्ट कॉल आणि स्मार्ट नॉटिफिकेशसारखे फीचर्स मिळतील.

 

2. ‘Dizo वॉच प्रो’ चे फीचर आणि स्पेसिफिकेशन्स…

– यामध्ये 320×385 पिक्सल रिझॉल्यूशन 1.75 इंच TFT LCD पॅनेल मिळेल. वॉचमध्ये दिलेली स्क्रीन 600 निट्स ब्राइटनेससह येते. यात 100 पेक्षा अधिक वॉच फेस दिले आहेत.
वॉचमध्ये 390 एमएएचची बॅटरी दिली असून, जी सिंगल चार्जमध्ये 14 दिवस टिकते.

– वॉचमध्ये 90 स्पोर्ट्स दिले असून, कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस आणि Glonass मिळेल.
हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी यात हार्ट रेट ट्रॅकिंग, SpO2 मॉनिटरिंग आणि स्लीप ट्रॅकिंग सारखे फीचर्स मिळतात.

 

 

Web Title :- Dizo Smartwatch | dizo watch 2 and dizo watch pro launched price specs and other details

 

हे देखील वाचा :

Coronavirus | चिंता कायम ! …तोपर्यंत कोरोना संकट रहाणारच; ‘WHO’ चा इशारा

OBC Reservation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 225 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts