IMPIMP

Tehsildar Jyoti Deore | तहसीलदार ज्योती देवरेंच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा, अ‍ॅड. असीम सरोदेंची अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार

by nagesh
Tehsildar Jyoti Deore | tehsildar jyoti deore corruption probe complaint Anti Corruption Bureau ACB) adv asim sarode

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन  Tehsildar Jyoti Deore | पारनेर (Parner) येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांनी पदाचा दुरुपयोग करुन केलेल्या भ्रष्टाचाराची (Tehsildar Jyoti Deore Corruption Case) चौकशी करवी, अशी मागणी पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील नागरिक कारभारी भाऊसाहेब पोटघन (Karbhari Bhausaheb Potghan) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) केली आहे. पोटघन यांनी अ‍ॅड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांच्यामार्फत ही तक्रार केली आहे. याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक हरीश खेडकर (Deputy Superintendent of Police Harish Khedkar) यांना आज (मंगळवार) तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

 

 

तक्रारीसंदर्भात अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले, नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Ahmednagar Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नेमलेल्या समितीने नुकताच अहवाल दिला आहे.
या अहवालामध्ये तहसीलदार देवरे यांनी वाळूउपसा केलेली वाहने जप्त केल्यानंतर कोणतेही सरकारी शुल्क (Government fees) भरुन न घेता ती वाहने सोडून दिली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अकृषक कामासाठी जमीन हस्तांतरित करताना अनियमितता, वाळू तस्करांना संरक्षण देणे तसेच देवरे या जळगाव (Jalgaon) येथे कार्यरत असतानाही भ्रष्टाचार केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देवरे यांची बदली झाली असली तरी कामाचे स्वरुप तेच राहणार आहे.
त्यामुळे देवरे यांच्या भ्रष्ट कामाची चौकशी (Anti Corruption Bureau) करवी अशी मागणी पोटघन यांनी केली आहे.

 

 

दरम्यान, देवरे यांच्या आत्महत्या (Suicide) करण्याबाबतच्या व्हायरल क्लिपसंदर्भात (Viral clip) अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले.

महिलांना कार्यालयस्थळी काम करताना बहुतांशवेळा दबाव, त्रास सहन करावा लागतो.
हे वास्तव आहे परंतु कुणाच्याही भ्रष्टाचाराची पाठराखण करता येणार नाही.
देवरे यांनीही आपल्या कर्यपद्धतीमध्ये बदल केला पाहिजे.
त्यांच्यावर अन्याय होत असले तर वकील म्हणून मी त्यांच्या मागे उभा राहिल.
परंतु त्यांनी आपल्या महिला होण्याचा गैरफायदा घेऊ नये, असेही अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले.

 

Web Title : Tehsildar Jyoti Deore | tehsildar jyoti deore corruption probe complaint Anti Corruption Bureau ACB) adv asim sarode

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price | खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईपासून मिळू शकतो दिलासा, सरकार घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय

Amravati News | अमरावतीमध्ये मोठी दुर्घटना ! होडी उलटल्याने एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले; तिघांचे मृतदेह बाहेर काढले, मदतकार्य युध्दपातळीवर सुरू

Pune Crime | शिवसेनेच्या नगरसेवकाकडं मागितली तब्बल 15 लाखाची खंडणी ! माजी उपसरपंच, पत्रकार व 4 महिला कार्यकर्त्यासह 9 जणांवर FIR, ‘रिपोर्टर’सह दोघांना अटक

 

Related Posts