IMPIMP

Anti Corruption Bureau | 1 रुपया हुंडा घेऊन सर्वांकडून पाठ थोपटून घेणारा नार्कोटिक्स विभागातील पोलीस निरीक्षक 2 लाखांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

जयपूर : वृत्तसंस्था – एक रुपया हुंडा घेऊन वाहवा मिळवलेल्या नार्कोटिक्स विभागातील (narcotics department) पोलीस निरीक्षकाला (police inspector) जयपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) दोन लाखांची लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहाथ पकडले. अमन फोगट Aman Fogat (रा. बडसरी बास, ता. सुजानगढ जि. झुंझुनु) असे लाच घेताना अटक केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. जयपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमन फोगट यांचे अडीच वर्षापूर्वी लग्न झालं होते आणि हुंड्याची पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला छेद देत केवळ एक रुपया घेऊन लग्न केले होते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक झाले होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

फोगट यांनी एक रुपया घेऊन लग्न केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. एवढंच नाही तर अमन फोगट यांच्या वडिलांनी आपल्या सुनेला चारचाकी वाहन भेट म्हणून दिले होते. पण आता अमन फोगट याला लाच घेताना पकडल्याचे वृत्त प्रसारीत होताच गावात पुन्हा एकदा अमन हे चर्चेचे केंद्रस्थान बनले आहेत.

 

जयपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) अमन फोगट यांना रंगेहाथ पकल्यानंतर त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. पथकाने घरावर धाड (ACB Red) टाकल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली आणि लाचेचे प्रकरण ग्रामस्थांना समजले. ज्या कुटुंबाचं उदाहरण आदर्श कुटुंब म्हणून सर्व गावकरी आजवर देत आले होते. त्याच कुटुंबातील व्यक्तीने केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

जयपूरच्या मेडिकल स्टोअरवर (medical store) कारवाई करताना मेडिकल स्टोअरच्या मालकाकडून पाच लाख रुपये लाचेची मागणी अमन फोगट यांनी केली होती.
पण तडजोडीत दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. दुकानदाराने जयपुर एसीबीकडे (Jaipur ACB) तक्रार केली.
त्यानंतर एसीबीनं सापळा रचून अमन फोगट यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
एसीबीकडून वरीष्ठ अधिकाऱ्यांना या मिशनसाठी नियुक्त करण्यात आले होते.
एसीपी कालूराम रावत (ACP Kaluram Rawat) यांच्या नेतृत्वाखाली एसीपी हिमांशु (ACP Himanshu)
आणि सुरेश स्वामी (ACP Suresh Swamy) यांच्या पथकाने अमन फोगट यांना रंगेहाथ पकडलं.

 

Web Title :- Anti Corruption Bureau | excise inspector caught red handed taking bribe Anti Corruption Bureau jaipur

 

हे देखील वाचा :

Former MLA Ravikant Patil | सोलापुरात जुगार अड्ड्यावर छापा ! इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह 29 जणांना अटक

Ananya Panday Bold Photo | अनन्या पांडेनं केलं स्वत:लाच ट्रोल, ‘सफरचंद’ सोबत केली तुलना

Monalisa Bikini Photo Viral | मोनालिसाच्या बिकिनीतील फोटोनं चाहत्यांच वाढवलं तापमान, पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts