IMPIMP

Disproportionate Assets-Crime News | काय सांगता ! होय, महिन्याला 5 हजार कमावणारा पालिका कर्मचारी 238 कोटींचा मालक; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाDisproportionate Assets-Crime News | बेहिशोबी मालमत्ता असणारी अनेक प्रकरणे (Disproportionate Assets
Case) आपण पाहिली आहेत पण आग्रा (Agra) येथील अशाच एका प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. आग्रा महापालिकेच्या (Agra Municipal
Corporation) एका माजी आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्याला महिन्याला पाच हजार रुपये मिळत होते. मात्र सद्य स्थितीला हा कर्मचारी २३८ कोटींचा मालक
असल्याचे समोर आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर अनेक वेळा भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप करण्यात आले आहेत इतकंच नाही तर त्याच्याविरुद्ध अधिकाऱ्यांनीही तक्रारी केल्या मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्या फाईली धुळीत पडल्याचा आरोप सपोर्ट इंडिया सोसायटीचे (Support India Society) अध्यक्ष आणि आग्राचे अधिवक्ता सुरेशचंद सोनी (Sureshchand Soni) यांनी केला आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे. (Disproportionate Assets-Crime News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अधिवक्ता सुरेश चंद सोनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, सिकंदरामधील राधा नगर कॉलनीत राहणारे राकेश बंसल हे २००८ मध्ये पालिकेच्या आऊटसोर्सिंग कर्मचारी म्हणून कामाला लागले होते. त्यांना महिन्याला पाच हजार रुपये पगार होता. दरम्यानच्या काळात त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यावेळी त्यांचे वेतन १९ हजार रुपये होता. मात्र पालिकेत काम करत असताना बंसल यांनी कोट्यवधीची संपत्ती मिळवली आहे. (Disproportionate Assets-Crime News)

 

बंसल यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या पण कोणीही त्यावर कारवाई केली नाही या तक्रारींच्या फाईली धूळखात पडल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्याने कोणीही कारवाई करू नये अशी व्यवस्थाही केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. २००८ ला पालिकेच्या आऊटसोर्गिंगवर तैनात असलेले बंसल २०२० पर्यंत पालिकेच्या नगरायुक्तांच्या वैयक्तिक सहाय्यक पदावर होते. या काळात त्यांच्याकडे आग्रा येथे नाही तर शेजारील जिल्ह्यातही त्याची संपत्ती असून अनेक लग्जरी गाड्याही आहेत. मात्र सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोप लागल्यानंतर त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आलं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

१० फ्लॅट, नोएडामध्ये मॉल, ३ गाड्या, रायफल आणि अन्य संपत्ती
सुरेश चंद सोनी यांनी दिलेल्या महितीनुसार बंसल यांच्याकडे दहाहून अधिक फ्लॅट, नोएडामध्ये मॉल, तीन गाड्या, रायफल आणि अन्य संपत्ती आहे. बंसल यांनी अनेक प्रॉपर्टी पत्नी, आई, भाऊ यांच्यानावावर खरेदी केल्या आहेत. त्याने आग्र्यात कोट्यवधींची जमिनदेखील खरेदी केली आहे. बंसल यांचे वडील चाटची गाडी चालवत होते. आर्थिक परिस्थिती जेमतेम होती त्यातूनच कशी तरी राकेश यांनी पालिकेत नोकरी मिळवली. त्यानंतर पार्किंग आणि जाहिरात आपल्या आवडत्या वा ओळखीच्या लोकांना देऊ लागले. मात्र त्यासाठी त्यांनी कमिशन ठरवलं होतं. इतकच नाही तर हॉटेल आणि रेस्टॉरंट संचालकांकडूनही अवैध वसुली केली. त्यांच्या या कामामुळे अनेकदा काढूनही टाकण्यात आलं होतं. पण ते प्रत्येक वेळी सेटिंग करायचे आणि पुन्हा कामावर रुजू व्हायचे असा आरोपही होत आहे.

 

Web Title :- Disproportionate Assets-Crime News | agra municipal corporation former contractual employee become owner of 238 crores

 

हे देखील वाचा :

Aadhaar – PAN च्या डिटेल्स शेयर करणार्‍यांनी व्हावे सावध, CBIC ने जारी केला इशारा

PPF Alert | पीपीएफ खात्यासाठी बदलले नियम, वाचा ‘ही’ महत्वाची माहिती अन्यथा अकाऊंट होईल बंद

SARTHI Pune | मराठा, कुणबी, कुणबी – मराठा व मराठा – कुणबी”या समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या भविष्यकालीन योजनांसाठी लेखी सूचना पाठविण्याचे सारथीचे आवाहन

 

Related Posts