IMPIMP

Types Of Provident Fund | भविष्य निर्वाह निधीचे प्रकार तुम्हाला माहित आहेत? तर मग जाणून घ्या EPF, PPF आणि GPF म्हणजे काय?

by nagesh
Types Of Provident Fund | types of provident fund what are epf ppf and gpf how much return on any investment know detail

सरकारसत्ता ऑनलाइन – Types Of Provident Fund | सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते संघटित क्षेत्रातील खासगी कर्मचाऱ्यांपर्यंत विविध भविष्य निर्वाह निधी (Types Of Provident Fund) आहेत. निवृत्ती योजना (Retirement Plan) म्हणजेच भविष्य निर्वाह निधी (PF) आहे. दरम्यान याचा फायदा संबधित कामगारांना मिळत असतो. त्यामुळे भविष्याच्या सुरक्षेकरीता आपला हक्क असणारा ही एक मिळकत आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही सर्वोत्तम साधने अनेक नागरीकांच्या पंसतीस पडत असतात. दरम्यान, या भविष्य निर्वाह निधीचे तीन प्रकार आहेत. नेमकं हे तीन प्रकार कोणते आहेत.? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) –
यामध्ये (कंपनी) 20 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. तर, पगारदार वर्गासाठी EPF खातं सुरू केले जाते. यात खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून (EPFO) खाते नियंत्रित केले जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वतःचे EPF खाते आहे. यात तुमच्या पगारातून ठराविक भाग कापला जातो. यात, नियोक्त्याच्या (Employer) वतीने या खात्यामध्ये समान हिस्साही ठेवला जातो आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी EPF वर 8.50 टक्के व्याजदर ठेवण्यात आलंय. पंरतु, याबाबत स्पष्ट माहिती नाही. कामगार मंत्रालयाच्या माहितीनूसार, मागील आर्थिक वर्षापर्यंत EPF वर 8.65 टक्के व्याज मिळत होते. EPF वरील व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जातेय. (Types Of Provident Fund)

2. सामान्य भविष्य निर्वाह निधी, (GPF) –
हे खाते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. GPF केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. हे एक प्रकारचे निवृत्तीनंतर केलेले पैशासाठी नियोजन आहे. कारण, त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळते. सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 15 टक्के GPF खात्यात योगदान देऊ शकतात. या खात्याचे ‘अ‍ॅडव्हान्स’ हे फीचर सर्वात खास आहे. यात कर्मचारी गरज पडल्यास GPF खात्यातून निश्चित रक्कम काढू शकतो आणि नंतर जमा करू शकतो. यावरही कोणताही कर नाही. 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 या तिमाहीसाठी सरकारने GPF चा व्याजदर 7.1 टक्के करण्यात आलाय. यात तिमाही आधारावरच व्याज ठरला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, (PPF) –
सरकारची छोटी बचत योजना म्हणून PPF कडे पाहिले जातेय. ही योजना म्हणजे सर्वसामान्यांसाठी असलेली योजना आहे.
त्यामध्ये खाते सुरू करुन कोणीही पैसे जमा करु शकणार आहे. PPF हा बचत निधी आहे. हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये सुरू करू शकता.
या खात्यामध्ये प्रतिवर्षी कमीत कमी 500 रुपये जमा करावे लागणार आहेत.
या खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत आयकर कपातीचा लाभ मिळतो.
एप्रिल ते जून 2020-21 या तिमाहीसाठी 7.1 टक्के व्याज मिळणार आहे. PPF वरील व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जातेय.

 

 

Web Title :- Types Of Provident Fund | types of provident fund what are epf ppf and gpf how much return on any investment know detail

 

हे देखील वाचा :

Nawab Malik-Kirit Somaiya | नवाब मलिकांचे आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल’

Pune Crime | धक्कादायक ! मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो एडिट करून बदनामी

Maharashtra Weather | महाराष्ट्रात किमान तापमान 6 अंशांनी खाली, ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी तापमान

 

Related Posts